----------------------------------------
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
घराचे कर्ज फेडण्यासाठी व गाडी घेण्यासाठी माहेरहून २२ लाख रु. घेऊन येण्यासाठी डिघोळअंबा येथील विवाहितेचा तिच्या सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी तिचा नवरा व सासू- सासऱ्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, अंजली शशिकांत सोनवणे हिस तिचे लग्न झाल्या पासून तिचे सासरी डिघोळआंबा येथे एक महिन्या पर्यंत चांगले नांदवले. त्या नंतर घराचे कर्ज फेडण्यासाठी व गाडी घेण्यासाठी माहेरहून बावीस लाख रुपये घेवुन ये; असे म्हणुन उपाशी पोटी ठेवुन जाचजुलुम केला. तसेच लाथाबुक्याने मारहाण करुन शारिरीक व मानसिक त्रास दिला आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
या प्रकरणी पीडित अंजली शशिकांत सोनवणे हिच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात तिचा नवरा शशिकांत नवनाथ सोनवणे, सासु संगीता नवनाथ सोनवणे आणि सासरे नवनाथ गोविंद सोनवणे रा. डिघोळअंबा ता. अंबाजोगाई यांच्या विरुद्ध गु.र.नं.३५९/२०२१ भा.दं.वि. ४९८ (अ), ३२३,५०४, ५०६ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनकर पुरी हे करीत आहेत.

