shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन केला बलात्कार..!!

आरोपी पोलिसांच्या ताब्यात : आरोपी विरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल : नराधमास चार दिवसाची पोलीस कोठडी...!! 
---------------------------------------- 
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी  :- केज  तालुक्यातील कोरडेवाडी येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. पोलिसांनी पीडित मुलीची सुटका करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.


या बाबतची माहिती अशी की, दि.२२ मार्च सोमवार रोजी रात्री ९:०० ते १२:०० वा. च्या दरम्यान केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. मुलीच्या पालकाच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. 
केज तालुक्यातील कोरडेवाडी साडेसोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस आरोपी श्रीराम संतराम वरपे  रा. कोरडेवाडी ता. केज ) याने २२ मार्च २०२१ रोजी मध्यरात्री फुस लावून पळवून नेले. या प्रकरणी केज पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपीचा तीन - चार वेळा तपास काढून ही ते न मिळाल्याने पुण्याहून पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. 

दरम्यान, आरोपी व मुलगी ही लोणीकाळभोर येथे असल्याची माहिती मिळताच २१ जुलै रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, जमादार बाळकृष्ण मुंडे, जमादार दिनकर पुरी, पोलीस नाईक मंदे यांचे पथक पुण्याला रवाना झाले. गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास या पथकाने छापा मारून आरोपी श्रीराम वरपे यास मुलीसह ताब्यात घेऊन केज पोलीस ठाण्यात हजर केले. 

पोलीस चौकशीत श्रीराम वरपे याने या अल्पवयीन मुलीस लोणीकाळभोर (जि. पुणे) येथे नेऊन तिला एका रुममध्ये ठेऊन चार महिन्या पासून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. 

या प्रकरणी सदर गुन्ह्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि  अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गु र नं १३७ /२०२१ भा दं वि ३६३, ३६६ अ, ३७६, ३७६(२)(एन), बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ४, ६, ८, १० आणि अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा (३)(२) (पाच)   गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी श्रीराम वरपे यास केजच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्यास २७ जुलै पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात अली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत
close