shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्व.पतीच्या पुस्तकाचे पत्नीच्या हस्ते प्रकाशन हे स्मृतीनमन होय - पत्रकार प्रकाश कुलथे


श्रीरामपूर । प्रतिनिधी :- भारतीय संस्कृती ही कुटुंबवत्सल आहे. पतीपत्नी म्हणजे दोन देहाचा एक श्वास आहे.शिर्डी येथील कुंभार समाजातील स्व.बाबुराव भीमाशंकर वाघचौरे यांनी लिहिलेल्या'अधुरी सोबत 'या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमती बबुताई बाबुराव वाघचौरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. स्व. पतीच्या पुस्तकाचे पत्नीच्या हस्ते प्रकाशन होणे म्हणजे पतीच्या भावस्मृतीला नमन असल्याचे मत महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे यांनी व्यक्त केले. 

येथील स्नेहप्रकाश प्रकाशनतर्फे शिर्डी येथील बाबुराव  भीमशन्कर वाघचौरे यांची "अधुरी सोबत"ही कादंबरी मार्च 2021प्रकाशित झाली, वयाच्या 93 व्या वर्षी लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन मात्र होऊ शकले नव्हते, ते पत्नी बबुताई वाघचौरे यांचे हस्ते व प्रमुख पाहुणे पत्रकार प्रकाश कुलथे,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये तसेच वाघचौरे परिवारांच्या हस्ते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रकाशन झाले, त्यावेळी प्रकाश कुलथे बोलत होते.

गोविंदा वाघचौरे यांनी स्वागत प्रास्ताविक करून आपल्या आजोबांच्या आठवणी सांगितल्या.प्रकाश कुलथे यांनी पुस्तकाचे आशयसूत्र उलगडून सांगितले. यावेळी स्व.बाबुराव वाघचौरे यांची मुले रवींद्र वाघचौरे,सतीश  वाघचौरे,मुकुंद वाघचौरे, रत्नाकर वाघचौरे, राजेंद्र वाघचौरे, सुना नलिनी रवींद्र वाघचौरे, रोहिणी सतीश वाघचौरे, वैशाली मुकुंद वाघचौरे,अश्विनी रत्नाकर वाघचौरे, कल्याणी राजेंद्र वाघचौरे तसेच नातवंडे प्रशांत, किरण,सचिन,शेखर, गोविंद आणि नातसुना मनीषा, माधुरी, मेघा,कोमल,शीतल आदी उपस्थितीत झालेला हा पुस्तक प्रकाशन सोहळा आनंद आणि आठवणींचा गुलमोहर असल्याचे मत अध्यक्षीय भाषणात डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी सांगून स्व.बाबुराव वाघचौरे हे गुणवान लेखक म्हणून नावारूपाला आले असते,पुस्तक लिहिल्यानंतर लगेच त्यांनी जगाचा निरोप घेतला. हीच खरी अधुरी सोबत ठरली असे डॉ.उपाध्ये यांनी सांगून आठवणी सांगितल्या.

यावेळी पत्रकार प्रकाश कुलथे यांनी अतिशय सुंदर व आकर्षक अक्षररचना करून पुस्तक मांडणी केली आहे तर डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पुस्तकाला अर्थपूर्ण केले व समर्पक प्रस्तावना लिहिली असे वाघचौरे परिवाराच्या‌ वतीने 
उपस्थितांच्या वतीने आभार मानत पत्रकार कुलथे, डाॅ.बाबुराव उपाध्ये यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सतीश वाघचौरे यांनी आभार मानले.
close