तरंगवाडी गावचे मारुती गायकवाड यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती.
इंदापूर प्रतिनिधी: (दि.२ जुलै २०२१) इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी गावचे मारुती किसन गायकवाड यांची हवलदार पदावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कामाची दखल घेऊन आणि सत्तावीस वर्ष पोलीस दलात केलेल्या कर्तव्याचा विचार करून कर्तव्याची जबाबदारी वाढवली. मारुती गायकवाड सध्या वाकड पोलिस ठाण्यांमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. .त्यांची कालच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. मुगळीकर व पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते गायकवाड यांना स्टार लावून पदोन्नत केले.
मारुती गायकवाड हे अत्यंत बिकट व आर्थिक हलाखीच्या परिस्थितीतून लहानपणापासून काबाड कष्ट करून शिक्षण घेऊन पोलीस दलात १९९४ सालापासून सेवेत रुजू झाले .ते नेहमीच हसतमुख आणि निर्भीड स्पष्टपणे बोलणारे हे त्यांची खासियत आहे. त्याचबरोबर कुटुंबाला कष्टाचे महत्त्व देऊन मुलांनाही उच्चशिक्षित करून त्यांना नावारूपाला आणले आहे. त्यांच्या या पदोन्नती मुळे इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्याचा वर्षाव होत आहे.

