shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोणकर कुटुंबाची राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली सांत्वन भेट ; भरणे कुटुंबाकडून एक लाख रुपयांची अर्थिक मदत

लोणकर कुटुंबाची राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी  घेतली सांत्वन भेट ; भरणे कुटुंबाकडून  एक लाख रुपयांची अर्थिक मदत

इंदापूर : (१८ जुलै २०२१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणारे उमेदवार स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने मागील काही दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. स्वप्निल च्या आत्महत्तेनंतर राज्य भरातून दु:ख व्यक्त करण्यात आले. या घटनेनंतर सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लोणकर यांच्या गंगासागर फुरसुंगी येथील घरी जाऊन कुटुंबीयांची(दि.१८ जुलै) रोजी भेट घेत सांत्वन केले.

स्वप्निल यांच्या जाण्याने घरचा कर्ता पुरुष गेला आहे.हे दु:ख सहज पचवता न येणारे आहे.ईश्वर हे दु:ख पचवण्याची हिम्मत लोणकर कुटुंबियांना देवो अशा शब्दात राज्यमंत्री भरणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवाय भरणे कुटुंबाच्या वतीने स्व.स्वप्निल यांच्या कुटुंबाला आधार म्हणून अर्थिक स्वरुपात एक लाख रुपयांची रोख मदत करण्यात आली. सदर विषयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे ठोस आश्वासन ही राज्यमंत्री भरणे यांनी कुटुंबियांना दिले आहे.
close