shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

न्यूमोनियापासून संरक्षणासाठी बालकांना ‘पीसीव्ही’ लस द्या :आयुक्त श्री.गणेश देशमुख यांचे नागरिकांना आवाहन ..!


विनया म्हात्रे-मेढेकर, पनवेल :-
पनवेल: बालकांचे न्यूमोनियापासून संरक्षण करण्यासाठी ‘न्यूमोकॉकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ या लसीचा समावेश राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांअंतर्गत करण्यात आला असून, या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवार 13 जुलै रोजी  नागरी प्राथमिक आरेाग्य केंद्र 1, गावदेवी मंदिर याठिकाणी करण्यात आले. यावेळी नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, मोनिका महानवर,आयुक्त श्री. गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वैद्यकिय अधिकारी डॉ.रेहाना मुजावर उपस्थित होते.

न्युमोकॉकल कॉन्जुगेट या बॅक्टेरियामुळे होणाऱ्या न्यूमोनियामुळे भारतात दरवर्षी 15.9 टक्के बालकांचा मृत्यू होत असून या रोगापासून बालकांचे संरक्षण व्हावे या हेतूने आजपासून नियमित लसीकरण कार्यक्रमामध्ये या लसीचा समावेश करण्यात आला आहे. हे लसीकरण पुर्णपणे मोफत असणार आहे. सध्या पनवेल कार्यक्षेत्रासाठी 500 वायलचा पुरवठा शासनाकडून करण्यात आला आहे. यापुढे आता नियमितपणे लसीकरणाअंतर्गत ही लस विनामूल्य शासकिय आरोग्य केंद्रावरती देण्यात येणार आहे.

'पीसीव्ही' लस नवजात बालकांना दीड महिन्याला, साडेतीन महिन्याला प्राथमिक डोस असून नऊ महिने पुर्ण झाल्यावर बूस्टर डोस दिला जाणार आहे. पाच वर्षाच्या आतील विशेषत्वाने दोन वर्षाच्या आतील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी केंद्रीय स्तरावरून देशभरात सर्वत्र हा लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. 

एक वर्षाच्या आतील बालकांना न्यूमोनिआ मेनेटायंटीस, बॅक्टेरिमिया सेपसीस ओटायटीस, आणि सायनुसायटीस आजारापासून ही लस संरक्षण देते. न्यूमोनियापासून संरक्षण व्हावे यासाठी बालकांना ‘पीसीव्ही’ लस  नागरिकांनी जरूर द्यावी असे आवाहन आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी केले आहे.

यावेळी नागरी आरोग्य केंद्रातील  डॉक्टर्स, परिचारिका, लाभार्थी नागरिक उपस्थित होते.
close