पनवेल । विनया मेढेकर:-
पनवेल : कोविडचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टिने गेल्या चार - पाच दिवसापासून पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अँटीजन आणि आरटीपीसीआर टेस्ट चे प्रमाण वाढविण्यात आले आहे.१४ जुलै रोजी महापालिकेच्या मुख्यालयात आयुक्त श्री. गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या सह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चाचण्यां करण्यात आल्या.
दिनांक ८ जुलैला आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात आरटीपीसीआर व ॲंन्टीजन चाचण्या वाढविण्याचे आदेश वैद्यकिय आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र चाचण्या केल्या जात आहेत. बुधवारी 14 जुलै रोजी महापालिका मुख्यालयात देखील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या.
बुधवारी पालिका मुख्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जवळपास १०० जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यापुढे . येणाऱ्या अभ्यागतांची देखील आरटीपीसीआर व
ॲंन्टीजन चाचण्या करण्यात येणार आहेत.

