नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के): नगर तालुक्यातील दहिगाव येथे जिल्हा परिषदची आदर्श शाळा असुन कोरोना मुळे सोशल डिस्टानचे सर्व नियम पाळत भुजबळ मॅडम यांचा सेवानिवृत्त सत्कार सन्मान आज शाळेत पार पाडला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व दहिगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला. या वेळी विद्यार्थीची कमतरता प्रकाशाने जाणवली शाळेत विद्यार्थी नसल्याने सुन सुन वाटत होतं. शासनाने आजुन शाळा सुरू करण्याची परवानगी दिली नाही.
श्रीमती भुजबळ मॅडम या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झाल्या त्यांची प्रथम नेमणूक श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे नेमणूक झाली होती. त्यानंतर अहमदनगर जिल्हा मध्ये अनेक गावांत सेवा दिली, त्यात ठराविक गाव म्हणजे नगर तालुक्यातील वाकडी या गावत तब्बल १६ वर्ष सेवा केली, त्यानंतर गुंडेगाव हराळ मळा
,म्हसणे,संगमनेर, शेडगाव, अशा अनेक विविध ठिकाणी ३७ वर्ष शिक्षक म्हणून सेवा दिली आज अखेर नगर तालुक्यातील दहिगाव शाळेवर ७ वर्ष पूर्ण सेवा देऊन पदवीधर शिक्षकी या पदोन्नतीने सेवानिवृत्त झाल्या.
आज सेवानिवृत्त छोटासा कार्यक्रम पार पडला या वेळी दहिगावाचे संरपच मधुकर म्हस्के, उपसरपंच महेश म्हस्के, माजी केंद्र प्रमुख घुले साहेब, मुख्याध्यापक ज्ञानेश्वरी जाधव,विक्रम नरवडे,धर्मनाथ हादेॅ,सुभाष गिरवले, सुवर्णमाला कालेॅ,मनिषा ठोंबरे, वर्षा काळे, आदी शिक्षक वर्ग व अंगणवाडी सेविका कमल जरे, संभाजी म्हस्के, पोपट मारुती पोटरे आदी ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.





