shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिवंगत पॅंथर रत्नाकर मखरे (तात्या)यांच्या जन्मदिनानिमित्त विश्वरत्न बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध कोवीड योद्ध्यांना "कोवीड योध्दा "पुरस्काराने सन्मानित..!!

दिवंगत पॅंथर रत्नाकर मखरे (तात्या)यांच्या जन्मदिनानिमित्त विश्वरत्न बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध कोवीड योद्ध्यांना "कोवीड योध्दा "पुरस्काराने सन्मानित..!!


इंदापूर: दिवंगत पॅंथर रत्नाकर  मखरे(तात्या) यांच्या जन्मदिनानिमित्त शुक्रवारी दि.०९ जुलै २०२१ रोजी  कोवीड योध्दा सन्मानपत्र हा कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा येथे आयोजीत करण्यात आला.
विश्वरत्न बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने  "कोवीड योध्दा"  सन्मानचिन्ह देवुन पुरस्कार वितरण यशस्वीरित्या संपन्न झाला.
     यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बावडा गावाचे सरपंच, किरण पाटील होते. तसेच उपसरपंच निलेश घोगरे, ग्रामसेविका अंबिका पावसे या देखिल उपस्थित होत्या.
    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव अॅड.राहुल मखरे, अॅड,समीर टिळेकर, डॉ.रघुनंदन पोमणे,डॉ.हीना शेख,डॉ.घोगरे, हे  उपस्थित होते. तसेच सर्व नर्स व आशासेविका,  ग्रामपंचायत सर्व कामगार वर्ग, अंगणवाडी सर्व सेविका, पत्रकार  यांना कोवीड योध्दा सन्मानचिन्ह देवुन सर्वांना गौरविण्यात आले आहे.
   यावेळी सुत्रसंचालन,अनिल कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन भिमराव कांबळे, संतोष सावंत सर, दादासाहेब कांबळे ,गौतम जगताप यांनी  केले.
    यावेळी रत्नाकर मखरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन   विश्वरत्न बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी केले .
close