प्रमोद चौधरी । जळगाव जिल्हा प्रतिनिधी:
एरंडोल-गॅस पेट्रोल डिझेल खतांच्या दरवाढीच्या निषेधार्थ एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी नऊ जुलै 2021 रोजी येथे धरणगाव हायवे चौफुलीवर रास्ता रोको व धरणे आंदोलन करण्यात आले जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे 35 मिनिटाच्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली त्यानंतर सायकल रॅली आंदोलन करण्यात आले तसेच प्रांत अधिकारी विनय गोसावी यांना निवेदन देण्यात चौफुलीवर झालेल्या रास्ता रोको आंदोलन प्रसंगी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार,जिल्हा सरचिटणीस अमित पाटील, व डॉक्टर राजेंद्र देसले, तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक प्रा.मनोज पाटील, डॉ. सुभाष देशमुख, सुदाम पाटील, प्रभाकर बडगुजर,पारोळा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, नगरसेवक नितीन चौधरी,नगरसेवक अभिजीत पाटील, विश्वास पाटील, किशोर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दत्तू पाटील, रामधन पाटील, उमेश देसले, राजेंद्र शिंदे, गुंजन चौधरी, ॲ. अहमद सय्यद, कपिल पवार, रवींद्र देवरे, दशरथ पाटील, विजय पाटील, नरेश भोई, दशरथ चौधरी, नगरसेवक असलम पिंजारी, अश्फाक बागवान, नगरसेविका वर्षा शिंदे, ईश्वर बिराडे, राजेंद्र शिंदे, रोहिदास पाटील, प्रशांत पाटील, दिनेश पवार, गोपाळ पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विकास पाटील, एकनाथ पाटील, एन डी पाटील, भिकन खाटीक आधी तालुक्यातील सरपंच उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले.
यावेळी एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, साहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला…

