शुक्रवार ता.०९ रोजी श्रीरामपुर तालुक्यातील महावितरणच्या कामाचा आढावा मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतला. या दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास अपयशी ठरलेल्या एका सहाय्यक अभियांत्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश त्यांनी कार्यकारी अभियांत्यांना दिले. तसेच एका बाह्यस्रोत कर्मचाऱ्याला देखिल निलंबित करण्याची सुचना केली.
नवीन ऊर्जा धोरणानुसार जे शेतकरी वीज बील भरत आहेत, त्यातील ६६% रक्कम पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वापरात येत आहे. परंतु अधिकारी व कर्मचारी यांनी देखिल शेतकऱ्यांना योग्य सेवा दिली पाहिजे याबाबतीत तनपुरे हे अत्यंत कटाक्षाने लक्ष घालत आहे.
श्रीरामपूर मतदारसंघासाठी नवीन कृषी ऊर्जा धोरणानुसार वांजुळपोई व घोगरगाव येथे नवीन सबस्टेशन प्रस्तावित आहेत. तसेच काही ठिकाणी नवीन रोहित्रे देखिल बसवण्यात येणार आहेत.
नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी देखिल शहराला पाणी पुरवठा करताना विद्युत पुरवठ्यातील अडचणीमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल तक्रार व्यक्त केली. पाणीपुरवठा योजनेला वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी व नगरपालिका प्रशासनासमवेत समन्वय ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना नामदार तनपुरे यांनी अतिशय कडक शब्दात सुचना केल्या.
महावितरण व ग्राहकांमध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी व ग्राहकांना योग्य सेवा पुरवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
"श्रीरामपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना, श्रीरामपूर नगरपालिका कार्यालयात नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांच्या उपस्थितीत काही नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह बैठक घेतली. शहरातील विविध प्रकल्प, विकासकामे आणि काही महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली."
या बैठकीसाठी आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष श्री. करण ससाणे, श्री. सचिन गुजर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. कैलास पाटील बोरुडे, शहराध्यक्ष श्री. लकी सेठी व महाविकास आघाडीचे इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिराती करीता संपर्क दिपक हरिश्चंद्रे ,राहुरी (तालुका प्रतिनिधी )7350591600




