shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी येथील तहसीलदार यांचा अनोखा उपक्रम : पोलिस कोठडीतील आरोपींना कोविड लसीकरण..!!

राहुरी -राहुरी  येथे तहसीलदार फसोउद्दिन शेख साहेब यांनी म्हणून पदभार  स्विकारल्यापासून  आपल्या कामाची पद्धत आणि कर्तव्यदक्षता यामुळे नेहमी जनतेच्या मनात तसेच  समाज माध्यमात नेहमीच  चर्चेत असलेले राहुरीचे तहसीलदार यांनी कोरोना काळातही आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे. त्याचाच भाग म्हणून राहुरी पोलिसांच्या कोठडीत असलेल्या आरोपींना कोरोना लसीकरण केले जाण्याची संकल्पना तहसीलदार शेख व्यक्त करत तालुका आरोग्य अधिकारी यांना पत्रव्यवहार करून लवकरात लवकर आरोपींना कोरोना लसीचे डोस उपलब्ध करून  देण्याचे कळविले आहे.



अहमदनगर जिल्ह्यातच नव्हें तर संपूर्ण महाराष्ट्रात आरोपी यांना जेल मध्ये लस मिळण्याची बहुदा ही पहिलीच घटना असावी.अनेक वेळेस आरोपींना न्यायालयात ,घटना स्थळी,ने-आण नेहमी करावी लागते,काही वेळेस नवीन आरोपी कोठडीत येत असतात आणि यामध्ये वेगवेगळ्या नागरीकांच्या संपर्कात आरोपी येत असल्याने कोरोना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भावकीच्या वाद, हुंडाबळी, किरकोळ चोऱ्या,शेतकऱ्यांच्या बांधावरून भांडणे,पती पत्नी वाद यासारख्या प्रकारातून न्यायालयीन कोठडीत  राहुरी जेलमध्ये असलेले आरोपींना इतर नागरीकांसारखे नंबर लावून कुठे लस मिळणार नसल्याने महसूल प्रशासनाने त्यांना जेल मध्येच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.



यामुळे पोलीस कोठडीत असलेले स्त्री आणि पुरुष यांना लस मिळणार आहे.आरोपी म्हणून जेल मध्ये असलेले शेतकरी,नागरीक, व्यापारी, हे परिस्थितीमुळे गुन्हेगार झालेले आहेत . त्यांना लसीकरण केल्यामुळे आरोपींच्या सुरक्षेत भर  पडून कोरोना संसर्ग टाळता येईल.राहुरीचे उपविभागीय अधिकारी डॉ. दयानंद जगताप यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांचे संकल्पनेतून पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ,तालुका आरोग्य अधिकारी  दीपाली गायकवाड यांचे सहकार्याने लवकरच लसीकरण शिबिर आयोजित केले जाणार आहे आशी माहिती मिळतेय.                                                                 

बातम्या आणि जाहिराती करीता संपर्क दिपक हरिश्चंद्रे ,राहुरी (तालुका प्रतिनिधी ) संपर्क क्र.-7350591600

close