shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुळा नदीवरील केंदळ-मानोरी पूलाचे कामाबाबत राज्यमंत्री तनपुरेंनी घातले लक्ष..!!

राहुरी: राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मानोरी-केंदळ बंधा-या समोरील नादुरुस्त झालेल्या पुलाबाबत नामदार प्राजक्त तनपुरे यांनी तातडीने लक्ष घातले असून या पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे देखील सांगितलं आहे.त्यामुळे तालुक्यातील पूर्व भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.         

       


"मानोरी-केंदळ पुल नादुरुस्त झाल्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते त्यामुळे संबंधित विभागाने या फुलाची तात्काळ दुरुस्ती करावी यासंदर्भात माध्यमांनी वेळोवेळी आवाज उठवून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे नामदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील या समस्येकडे तात्काळ लक्ष घातल्याने ना. प्राजक्त  तनपुरे तसेच माध्यम प्रतिनिधींचे विशेष आभार केंदळ-मानोरी येथील ग्रामस्थांनी मानले आहे."                                 

मुळा नदीवरील जीर्ण झालेल्या या पुलावरून धोकादायक वाहतूक सुरूच असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने संबधीत विभागाने तात्काळ याठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा केंदळ येथील ग्रामस्थानी दिला आहे. 

मानोरी-केंदळ खुर्द- केंदळ बृ.,चंडकापुर (ता.राहुरी) आदी गावांना जोडणारा मुळा नदीवरील बंधा-या समोरील पूल हा गेल्या अनेक दिवसापासून जीर्ण झाला आहे.सदर पूलाची मर्यादा देखील अनेक दिवसांपासून संपलेली आहे. त्यामुळे पुलाचा काही भाग कोसळला आहे तर हा पुल देखील अंतिम टप्प्यात कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन पुल व्हावा अशी मागणी नागरिकांनी केली होती त्यामुळे सदर बाबीकडे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तातडीने लक्ष घातले असुन शुक्रवारी  शासकीय विश्रामगृहात कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्यासह उच्चस्तरीय अभियंता आणि अधिकारी यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून लवकरच पुलाचे कार्य सुरू करण्यात यावे अशा सूचना दिल्या आहेत.त्यामुळे तालुक्यातील पुर्व भागातील नागरीकांमधे समाधानाचे वातावरण आहे. 

या कामाबाद मा. खा. प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाने माजी उपसभापती रविंद्र आढाव, बाळासाहेब खुळे आदिंनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.  

बातमी आणि जाहिराती करीता संपर्क: दिपक हरिश्चंद्रे ,राहुरी (तालुका प्रतिनिधी )7350591600

close