माने बंधू यांनी स्वतःच्या शेतजमिनीवर बनविली अभ्यासिका..!!
प्रतिनिधी : संजय वायकर
सांगली : (दि . २२) : शिक्षणाला किती महत्व असतं याची जाणिव असणारे माने बंधु यांनी सांगलीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या शेतजमिनीवर लाखो रुपयांचा खर्च करून अभ्यासिका बनविली आहे .
सांगली येथील एबीपी माझा चे पत्रकार कूलदीप माने यांना शिक्षणाप्रती असणारी आस्था स्वस्थ बसू देत नव्हती . शिक्षणासाठी होणाऱ्या त्रासाची त्यांना जाणिव होती .यातच गावातील मुले शिक्षण व अभ्यासाच्या शांततेसाठी बाहेरगावी जातात . हे पाहून गावातील मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा मनी बाळगून त्यांनी स्वतःच अभ्यासिका चालू करण्याचे नियोजन केले . त्यांच्या या कल्पनेस त्यांचे बंधु संदीप माने यांनी साथ दिली . आणि माने बंधु यांनी मुलांसाठी गावातच स्वतःच्या शेतजमिनीवर लाखो रुपये खर्च करून अभ्यासिका सुरु केली .
गावात पत्ते खेळण्याचे तसेच दारुचे अड्डे सुरु झाले .काहींनी व्याजाचे धंदे काढले परंतु माने बंधु यांनी मात्र समाजा प्रती असणारी आस्था आणि शिक्षणाची असणारी जाणिव यामुळे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरु करून समाजाला एक आदर्श घालून दिला .
लाखो रुपये खर्च करून शहरात अभ्यासाला जाणाऱ्या मुलांना आपल्याच गावात थांबवून अभ्यास करण्यास प्रवृत्त केले . मुलांना ध्येय गाठण्यासाठी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मोठे साधन दिले .
आज जवळपासच्या सर्व गावातील मूले ,युवक माने बंधू यांच्या अभ्यासिकेत जावुन अभ्यास करत आहेत . येथील शांत व अभ्यासपूर्ण वातावरणामुळे मूले नक्कीच स्वतःचे ध्येय साध्य करतील .
बदल हा बोलून होत नाही तर करून दाखवावा लागतो याचे उदाहरण माने बंधू यांनी समाजाला दाखवून दिले आहे .
या अभ्यासिका उपक्रमाचे मात्र सर्व स्तरातून कौतुक होत आहे .

