नगर प्रतिनिधी-(शिवा म्हस्के)
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार प्रारंभ करण्यात आलेल्या शिव संपर्क अभियानांतर्गत गुरुवार दि.२२ जुलै २०२१ रोजी गुंडेगाव गणामधील मधील मौजे गुंडेगाव येथे शिवसेना अहमदनगर जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले,
पंचायत समिती सभापती संदिप गुंड,उप सभापती डाॅ.दिलिप पवार,शिवसेना उप तालुकाप्रमुख प्रकाश कुलट,तालुका अध्यक्ष राजेंद्र भगत,जिवाजी लगड, सेनेचे प्रमुख नेते यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान गुंडेगाव येथे संपन्न झाले. शिवसेनेने गेल्या पाच दशकाच्या वाटचालीत मराठी माणसाची अस्मिता जपत आपले राजकीय अस्तित्व वेळोवेळी दाखवून दिले आहे.
शिवसेनेचा सर्वसामान्य माणसांचे हित जपणे हाच विकासाचा खरा मंत्र आहे. शेतकरी हिताचे निर्णय घेणारा पक्ष म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे.
तसेच पक्ष संघटनेची मजबुती व कार्यकर्ता सक्षमीकरणासाठी उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात सर्वत्र शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे .
शासनाच्या योजना व पक्षाची उद्दिष्टे शिवसैनिकांनी जिल्ह्यासह गावोगावी कानाकोपऱ्यात पोहचवयाची असून तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत शिवसैनिकांनी पोहचण्याचे काम करायचे आहे. सेनेच्या संघटनीकरणासाठी सुरू झालेले शिव संपर्क अभियानात शिवसैनिक मनापासून सक्रीय राहतील.सेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला एकाकीपणा जाणवणार नाही.
त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षसंघटना ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिल.या अभियानास शेतकरी तसेच शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत.या अभियानांतर्गत संघटनात्मक बांधणी, पक्ष बांधणी, बुथप्रमुख, गटप्रमुख, सह-गटप्रमुख तसेच पदाधिकार्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, कोरोना मुक्त गाव याविषयी आढावा घेतला व या संदर्भात चर्चा केली. तसेच शिवसेनेची जिल्हयात ताकत वाढविण्यासाठी आम्ही कोठेही कमी पडणार नाही.सर्वसामान्य माणसाचे हित हा केंद्रबिंदू मानून पक्ष विस्तार आणि कार्यकर्ता सक्षमीकरणाचे व्यापक कार्यक्रम जोरदारपणे सुरु राहतील पक्ष विस्तार आणि संघटना बांधणी याचे पक्षीय आदेश वेळोवेळी अमलात आणले जातील.तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू असून यावेळी शिवसेना आपले अस्तित्व पूर्ण ताकतीने दाखवून देईल व शिवसेनेचाच सर्व ठिकाणी भगवा फडकला जाईल असे प्रतिपादन जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी केले.शिव संपर्क अभियान योजनेचा जाहीरनामा यावेळी प्रसिद्ध करण्यात राजेंद्र भगत यांनी जाहीर केला,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण गोरे यांनी केले कार्यक्रमाचे आभार गुंडेगाव शाखाप्रमुख संजय भापकर यांनी मानले.
यावेळी थोर समाज सेवक राजारामबापू गुरुजी, गुंडेगाव शिवसेना शाखेचे सत्यवान कोतकर,गुडेगावचे ग्रामपंचायत सदस्य संतोश धावडे,भवानीप्रसाद चुंभळकर, सुनिल भापकर,अनिल भापकर, दत्ता भापकर, प्रशांत कोतकर, प्रदिप भापकर आदिंसह जिल्ह्यातील सर्व आजी माजी शिवसैनिक उपस्थित होते.यांच्या सह जिल्हा शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, विभागप्रमुख, उप-विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

