shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा व डाॅ. राधिका शहा ‘कोविड योद्धा’ पुरस्काराने सन्मानित.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा व डाॅ. राधिका शहा ‘कोविड योद्धा’ पुरस्काराने सन्मानित.

इंदापूर :प्रतिनिधी(२२ जुलै २०२१)

इंदापूर येथील सुप्रसिद्ध होमिओपॅथीक डाॅक्टर तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष डाॅ. संदेश शहा यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


सागा फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर धापटे, मुख्य संयोजक महेंद्र रेडके यांनी इंदापूर येथील पंचायत समिती सभागृहामध्ये कोविड योद्ध्यांचा सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ तसेच अखिल भारतीय स्वस्त धान्य संघटनेचे अध्यक्ष  प्रल्हाद दामोदरदास मोदी यांच्या हस्ते तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डाॅ. संदेश शहा व डॉ. राधिका शहा यांना कोविड योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले.

डाॅ. संदेश शहा यांनी कोरोना महामारीत सुरुवातीच्या काळा पासून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघ, आरोग्य संदेश बहुद्देशीय प्रतिष्ठान तसेच समाजभूषण शरदकुमार माणिकचंद शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत पंधरा हजार रुग्णांना मोफत होमिओपॅथीक औषधे दिली आहेत. केंद्र शासन आयुष मंत्रालय निर्देशीत पंचतुळशी व पंचहळदी हजारो रुग्णांना ना नफा ना तोटा तत्त्वावर वितरीत करण्यात आले.  त्यांनी झुम अॅपवरती राज्यात हजारो नागरिकांना कोरोना संदर्भात मोफत समुपदेशन केले आहे.   कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना देखील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सागा फिल्म फाउंडेशन च्या वतीने त्यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी संदीप चिलेकर,सोनल मोदी, शकिलभाई सय्यद, कैलास कदम, हर्षवर्धन कांबळे,धनंजय कळमकर, दिपक खिलारे, श्रेयश नलवडे, कैलास पवार,  उपस्थित होते.

close