shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोबाईलचे व्यसन... शिवव्याख्याते गोपाळ माने



आजच्या तरुण-तरुणींना जणू मोबाईल चे व्यसन
लागले आहे.महाराष्ट्रामध्ये गेली दोन वर्षापासून आम्ही सर्वे करत आहोत.महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये सर्वात जास्त 16- 25 या वयोगटातील मुला-मुलींना मोबाईलच्या आहारी गेले आहेत.
पूर्वीच्या काळामध्ये लोक पत्रव्यवहार करायचे.
पत्रव्यवहार हा पोस्टाच्या माध्यमातून केला जायचा.
आज पत्र पाठवलं तर ते पंधरा दिवसाच्या नंतर ते पत्र त्या ठिकाणी जाऊन पोहोचायचे.आज मात्र तशी परिस्थिती नाही.

आज लोक चंद्रावर जाऊन राहू लागली विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोक जगभर पोचू लागलीत जगभरातून माहिती मिळवू लागली आहेत.आजच्या तरुण-तरुणींना कॉलेज जीवनामध्ये जीवन जगत असता आपण काय करतो काय करत आहे काय करणार आहोत.याची त्यांना काहीही जाणीव नसते त्याचं कारण आहे.त्यात त्यांच्या वयाचा दोष असतो.
मुला-मुलींचं अट्रॅक्शन अटॅचमेंट हे वयाच्या पंधरा-सोळा वा वर्षानंतर होत असतं.मोबाईलच्या माध्यमातून आता तर या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आणि लवकर होत आहेत.गेली दोन वर्ष आम्ही सर्वे करत असताना लक्षात आले ग्रामीण भागातील आई-वडील आपल्या पाल्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवतात आणि त्यांना सगळं काही कळतं अशा भावनेने ते त्यांना समजून घेतात.

ग्रामीण भागातील व शहरी भागातील पाल्यांच्या पालकांना या लेखाच्या माध्यमातून इतकंच सांगायचं आहे की आपण आपल्या मुलामुलींवर ती आवर्जून लक्ष ठेवणे गरजेचे आहे.पूर्वी शहरांमध्ये श्रीमंत लोकांचे मुलंच आत्महत्या करतात असा प्रकार घडत होता.आता मात्र ग्रामीण भागांमध्ये देखील अशा घटना ऐकायला व पाहायला मिळत आहेत.याचं कारण आहे फक्त आणि फक्त मोबाईल.

आई-वडिलांनी आपल्या मुलाचा मोबाईल तपासावा दिवसभर मुलांनी काय काय केले आहे हेदेखील त्यांना विचारणे गरजेचे आहे.मोबाईल मुळे डोळ्याचे आजार डोक्याचे आजार अंधत्व लवकर येत आहे.आई वडील परिस्थिती नसतानादेखील मुला-मुलींना हवं ते घेऊन देतात.नको ते लाड पुरवतात याचा विद्यार्थ्यांनी तरुण-तरुणींनी विचार करणे गरजेचे आहे.ग्रामीण भागातील लोकांची परिस्थिती तर खूपच बिकट आहे.

अशी परिस्थिती असताना देखील आई वडील आपल्या मुलांना शिकता यावं म्हणून मोबाईल घेऊन देतात.
ऑनलाइन शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची खूपच बिकट अवस्था झाली आहे.
ज्या वयामध्ये शिकण्याची सवय लावून घ्यायची असते त्या वयामध्ये मोबाईल नावाचे व्यसन लागले आहे.
कॉलेज जीवनात आई वडील मुला-मुलींना शिक्षणासाठी मोठमोठ्या शहरात पाठवतात.
परिस्थिती नसतानादेखील ते तुम्हाला शिक्षणासाठी लागेल तो खर्च करायला तयार असतात.
ग्रामीण भागातील मुले शहरात गेल्यानंतर त्यांना सगळं काही नवनवीन पाहायला मिळते.

फाईव्ह स्टार हॉटेल, पब, डान्स बार, क्लब, पाहणे हे सगळं नवीन नवीन वाटत असल्यामुळे त्यांना त्याची आवड निर्माण होते. 16- 26 वर्ष हे आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे असते. याच वयात मुलं व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात प्रेमाच्या आहारी जाऊ शकतात.
दारू पिणे सिगारेट ओढणे बाहेरचं जेवण करणे ड्रग्स घेणे प्रेम करणे हे सगळे माणसाला लागणारे व्यसन आहे.

ज्या वयात शिक्षण घ्यायची महत्त्वाचे असते. ज्या वयात पैसे कमवायचे महत्त्वाचे असते. त्या वयात मात्र आम्हाला वेगळ्याच सवयी लागतात.
आज कालच्या तरुण-तरुणींना प्रेमाचे खूप मोठे व्यसन लागले आहे.

याच कारणामुळे कॉलेज जीवनामध्ये मुलांना वाईट सवयी लागतात.तरुण-तरुणी मोबाईलच्या नादी लागून आळशी बनत चाललेले आहेत.वेळेवर झोप घेत नाहीत वेळेवर ती जेवण करत नाहीत वेळेवर ते अभ्यास नाही.मोबाईल मुळे माणस माणसाशी माणसा प्रमाणे वागत नाहीत.कोणीतरी आपल्याशी बोलत आहे याचं गांभीर्य आजच्या तरुण-तरुणींना राहत नाही.ते बोलत असतात आपण मात्र मोबाईल मध्ये गुंतून गेलेले असतो.

अशाच घटना महाराष्ट्रामधल्या कित्येक लोकांसोबत घडलेल्या आहेत.आम्ही  सर्वे करत असताना लोक आम्हाला सांगायचे आजकालची पोरं मोठ्या माणसांचा मान सन्मान करत नाही बोललं तर बोलत नाही माणुसकी शिल्लक राहिलेली दिसत नाही.त्यांच्या बोलण्यातून हे शब्द यायचे.महाराष्ट्रातल्या तरुण-तरुणींना माझं आव्हान आहे.आपण या व्यसनापासून दूर व्हा.आपणाला ज्या समाजाने या कुटुंबाने ज्या गावाने मोठा केला आहे.त्यांना वेळ द्या,आत्महत्येसारखा प्रकार देखील मोबाईल मुळेच वाढला आहे हे आम्हाला अभ्यास करताना लक्षात आलेले आहे.
विचारांची देवाण-घेवाण करा मोबाईल ला मोबाईलच्या ठिकाणी ठेवा.

मोबाईलमुळे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, टेलिग्राम हे सगळे ॲप आपण वापरतो.
देश-विदेशातील लोक जोडली जात आहेत मित्र-मैत्रिणी भेटत आहेत.मोबाईल मुळे आणि ट्रम्प सारखे प्रकार देखील घडत आहेत.ज्या मुलांना मुलींना हे सगळं नवीन वाटतं ती लोक याच्या आहारी खूप लवकर जात आहेत.नवीन मैत्री होते फ्रेंडशिप वाढते प्रेम होते. पुढे हळूहळू सर्व काही घडत जाते.

असलीस व्हिडिओ असली फोटो एकमेकांना पाठवणे याच कारणामुळे ही बातमी घरी कळाल तर या फोटो समाजात प्रसारित केल्या तर अशा धमकी देऊन लोकांना फसवून पैसे उकळणे असे लोक मोबाईलच्या माध्यमातून आपला व्यवसाय करत आहेत.आपले आई-वडील आपल्यावर ती प्रेम करतात आपले बहीण भाऊ आपला मित्र परिवार आपल्या प्रेम करतो त्यांच्यासाठी वेळ द्या.

शिवव्याख्याते गोपाळ माने
      8208313194
close