"शाळा बंद पण शिक्षण चालू" अनंतराव पवार विद्यालयाच निर- निमगाव चा' शिक्षक आपल्या दारी' हा उपक्रम ..!
गेली २२ वर्षापासून अनंतराव पवार विद्यालय नीर - निमगाव इयत्ता दहावी चा निकाल शंभर टक्के लागत आहे. ती परंपरा या वर्षीही जपण्यात आली आहे.
इंदापूर प्रतिनिधी: गेल्या वर्षापासून कोरोना संक्रमणाच्या प्रादुर्भाव आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी कोरोना महामारी पासून सुरक्षा मिळावी या कारणाने देशातील व राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शिक्षण दुरावले गेल्याने या शिक्षणाची गोडी लागावी आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहावे यासाठी निर निमगाव येथे कोविंड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद पण शिक्षण चालू या
उपक्रमांतर्गत अनंतराव पवार विद्यालयाचे "शिक्षक आपल्या दारी "उपक्रमा ची सुरुवात करण्यात आली . राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचा ऑनलाइन अभ्यासक्रम सध्या शिकवला जात आहे. झूम ॲपच्या माध्यमातून शिकवल्या जाणाऱ्या ऑनलाईन
तासीकेस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे व विद्यार्थी पालक यांना ॲप्लिकेशन घेण्यासाठी मदत करणे. तसेच सेतु अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका पोहोच करणे. यासाठी शिक्षक आपल्या दारी उपक्रम हा निर- निमगाव गावामध्ये, खडप्पा वस्ती , भगतवाडी, भाऊसाहेब नगर, पिठेवाडी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शनिवार दिनांक १७ जुलै २०२१ व सोमवार दिनांक १९ जुलै २०२१ रोजी राबवण्यात आला.
यामध्ये विद्यालयाचे शिक्षक मुख्याध्यापक गरगडे सर ,मोरे सर, भाग्यवंत सर, मकर मॅडम, डोळे सर, गवळी सर, गोरे सर, डोंबे सर मुलानी सर , घोगरे सर, घोगरे मॅडम यांनी सहभाग घेतला.
शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम राबविल्याने अनंतराव पवार विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय घोगरे यांनी शिक्षकांचे विशेष कौतुक केले.

