राहुरी - दिपक हरिश्चंद्रे (तालुका ,प्रतिनिधी) ता.३० जुलै महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेत कार्यरत असतांना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ०९ वारसांना अनुकंपा तत्वावर कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांचे शुभहस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. सदरच्या दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर नियुक्ती आदेश देणे गरजेचे असतांना आदेश निर्गमीत करावयाची प्रक्रिया तांत्रिक बाबींचा आडोसा घेत प्रशासनाने जवळपास एक वर्षापासुन रखडवून संबंधीत वारसांना नियुक्ती आदेश मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते.
परंतु, कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या कर्तव्य दक्षतेने व गतिमान प्रशासनाच्या संकल्पनेतुन सदर नियुक्ती आदेश निर्गमीत करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात आली. अनुकंपा तत्वावर निर्गमीत करण्यात आलेल्या नियुक्ती आदेशातील ८ कर्मचाऱ्यांना वर्ग-४ संवर्गात व एका कर्मचाऱ्यास वर्ग-३ संवर्गात नियुक्ती देण्यात आली. सदर उमेदवारांना विद्यापीठ सेवेत सरळसेवेने अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिल्याबद्दल मा. कुलगुरुंचे सर्वच स्तरांतुन स्वागत करण्यात येत आहे.
या कामगीरी बद्दल कर्तव्यदक्ष कुलसचिव व त्यांचे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे खूप मोठी मदत झाली. तसेच विद्यापीठात आयोजित केलेल्या या प्रातिनिधिक स्वरूपाच्या कार्यक्रमात मा. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या शुभहस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. याप्रसंगी अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक फरांदे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, तत्कालीन कुलसचिव डॉ. महानंद माने आणि नियंत्रक श्री. विजय कोते, आदि अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Shirdi Express Live#(राहुरी- तालुका प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे. 📲7350591600

