shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार क्राईम रिपोर्टर असल्याचे सांगून हप्ता मागणा-या तोतया महिला पत्रकारांसह दोघांना अटक..!!

पुणे:- त्रकार असल्याचे ओळखपत्र गळ्यात घालून आम्ही क्राईम रिपोर्टर (गुन्हे विषयक पत्रकारिता) असल्याचे सांगून परमिट रूमचालकाकडे हप्ता मागणा-या तोतया महिला पत्रकारांसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 30 वर्षीय परमिट रूम चालकाने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.



हाजलिना प्रमोद जयस्वाल (वय 35, रा. ताडीवाला रोड) आणि सतपाल सिंग अमरसिंग बग्गा (वय 57, रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सेवन लव्हज चौक येथे इंप्रेस सेव्हन लव्हज परमिट रूम आहे. त्यांच्याकडे हाजलिना जयस्वाल व सतपाल बग्गा हे शनिवारी आले होते. त्यांनी गळ्यात सीसीटी क्राईम चेक टाईम्स या नावाच्या वृत्तसंस्थेची पत्रकार असल्याचे ओळखपत्र घातले होते.

त्यांनी आम्ही गुन्हे बातमीदार असून तुम्ही बेकायदा दारू विक्री करीत आहात. लोकांना परमिटरूममध्ये मद्यपानाची परवानगी देता. तुमच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तुमच्या मालकांना आमचे पथक बोलवत आहे, असे सांगितले. त्यानंतर ते एक हजार रुपये घेऊन निघून गेले.

केस करायची नसेल तर जादा 5 हजार रुपये द्यावे लागतील, असे त्यांनी फोन करून सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी खडक पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. तेव्हा पोलिसांच्या सूचनेनुसार फिर्यादीने त्यांना पैसे देण्याची तयारी दर्शविली. शनिवारी दुपारी ते पैसे घेण्यासाठी आले असताना पोलिसांनी दोघांना पकडले.

close