shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुंडेगाव येथील प्राचीन श्री शुढळेश्वर देवस्थान येतेय नावारुपाला..!!

नगर प्रतिनिधी- शिवा म्हस्के:

---------------------------------------

माहीती संकलन:-

दादासाहेब आगळे (गुंडेगाव)

----------------------------------------             

नगर तालुक्यातील शेवटच्या हद्दीतील गाव निसर्गमय डोंगर कुशीत वसलेले गाव गुंडेगाव या गावचे भुषण जेष्ठ समाजसेवक भापकर गुरूजी हि या ठिकाणी वास्तव्यास आहे. या ठिकाणी वरून आपलं समाजसेवक कार्य चालू आहे.


गुंडेगावची ऐतिहासिक माहीती.....

आपण हे ऐकले असेल किंवा  वाचलेली असेल ही . आपल्या महाराष्ट्राला ऋषीमुनींचा, संतांचा,छत्रपतींचा,वारसा लाभला आहे आणि त्यांच बरोबरच संस्कृती तसाच इतिहास ही लाभला आहे.असेच तीर्थक्षेत्र अहमदनगर तालुक्यातील गुंडेगाव येथील दक्षिण काशी  सेवाळतिर्थ उर्फ शिवरतळे नावांने रुढ असलेले तिर्थाचे ठिकाणी अनेक सिद्ध  आणि संत पुरुषांनी तप केले आहे. ते म्हणजे बाबाजी बुवा अरणगावकर, लिंबराज महाराज देवदैठणकर नंतर महम्मद बुवा वाहऱ्याचे,महाराज श्रीगोंदेकर  यांनी केलेले आहे.तसेच पूर्वीचे काळात ऋषीपैकी मांडव्य ऋषी व गुंड ऋषी यांनी तप केलेले आहे मांडव्य ऋषी चे स्थान योजन पूर्वेला सिद्धेश्वराचे स्थानी तप केलेल्या ठिकाणास मांडणंगण हे नाव प्राप्त झाले आणि रामेश्वर व मरगळनाथ या ठिकाणी तप करणारे गुंड ऋषी यांचे नावा वरून गुंडेगाव हे नाव पडले.

 सेवाळतीर्थाचे जवळच शुढळेश्वर नावाचे शिवलिंग आहे. त्याचा संबंध रामायण कालापर्यंत येतो चौदा वर्षाच्या वनवास काळात भगवान रामचंद्र प्रभुने गोदातटी पंचवटीत वास्तव्य केले आणि रावणखने सीतामाईस पळवून नेल्यानंतर प्रभु राम गोदारातटाने  प्रवरासंगम तटी आल्यानंतर ते डोंगरगण तसेच ज्या ज्या ठिकाणी हेमाडपंती देऊळ (शिवलिंग) असतील तो मार्ग रामाचा दक्षिणपथ सिता शोधाचा मार्ग समजण्यास हरकत नाही कारण या हेमाडपंथी मंदिराची रचना एकसारखी दगडावर केलेले कोरीव काम देवदेवतांच्या मूर्ती त्यांच्या अंगावरील दागिने या सर्व हेमाडपंथी देवालयातील एकसारखी आहेत. राम शिवभक्त असल्यामुळे शिवपूजा झाल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसत.अशाच देवळा पैकी गुंडेगाव येथे तीन हेमाडपंती देवळे आहेत शेवाळतिर्थाच्या जवळ असलेले शुढळेश्वर महादेवाचे लिंग आणि त्याचेच जवळ असलेले पाच शिखरांचा गिरी हे दंडकारण्याची दर्शन आजही देत असल्याचा भास होत आहे.

 या शेवाळ तीर्थावर श्री निंबराज महाराज आले तेथे स्नान करून महाद्वाराचा प्रसाद घेऊन निघाले ते शेवाळतिर्थास गेले तेथे त्यांनी स्नान केले तेथून एक योजना अंतरावर पूर्वेस मांडव्यऋषी स्थान व उत्तरेस डोंगरावर महिंदेश्वर लिंग आहे सरोवराच्या नेतृत्व नैऋत्य कानास अर्धा योजनावर मल्हारलिंग आहे असे या परिसरात निंबराज आले त्या तिर्थात स्नान केले.शिवाचे दर्शन घेतले भजन आरंभले अन्न घेतले नाही तेव्हा शंकर पार्वतीस म्हणाले की निंबराज हा माझा प्रसाद पुत्र आहे पांडुरंगाने त्यांचा गौरव केलेला आहे.आपल्या पुत्राने (गणपतीने)त्यास प्रसाद दिलेला आहे.तो क्षुधिक आहे तरी त्याचा तुम्ही सांभाळ करावा.



 हे ऐकून पार्वतीने गवळणीचे रूप घेऊन दही दूध भरून घेऊन ती निंबराजा जवळ आली निंबराजाने तिला पाहिले व विचारले की तुम्ही या ठिकाणी अशा वेळी कशाकरता आलात? जगदंबा म्हणाली आमची ही रोजची वाट आहे.परंतु तुम्ही येथे का बसला ? तुमचे भोजन झाले की नाही? तेव्हा निंबराज म्हणाले "मला उपोषण(उपवास) आहे" नंतर अंबेने पाटी उतरविली  व थोडेसे दूध घ्या म्हणजे भजन करण्यास उत्साह येईल,आमचे गाईचे दूध फार गोड आहे ते घेतले असता तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तूम्हाला कीर्तनाची आवड आहे तर त्यामुळे त्यात रस वाढेल यावेळी निंबराज गदागदा हसले व म्हणाले आईसाहेब आपण माझ्यावर फार ममता करता. अंबा म्हणाली तुम्ही हे दूध घ्या म्हणजे त्याचा अनुभव तुम्हास येईल. निंबराजाने ते दूध घेतले व तुमच्या किर्तनाने सर्व लोक आनंदित होतील असा वर तिने त्यास जाण्यापूर्वी दिला.निंबराने आंबेस नमस्कार केला.व अंबा घरी निघून गेली.




निंबराजाच्या जिव्हेस (जिभेस)स्फुर्ती झाली काव्य करण्याकरिता बुद्धीचा विकास झाला सर्व रात्रभर भजन केले व पहाटे तुम्ही घेऊन घरी देवदैठण ला गेले व तिथे निंबराजानी कीर्तन करुण भगवंत भक्ती मुहूर्तमेढ रोवली ती आजही पाहवयास मिळत आहे.तसेच दुसरी ऐतिहासिक गावाची ओळख म्हणजे गुंडेगाव हे गाव पूर्वी शिंगणापूर या नावाने ओळखले जाईल शिंगणापूरला पूर्वी हत्तीचा बाजार भरत असे असाही उल्लेख आढळतो इ.स.१६५०च्या दरम्यान बुवाजी बुवा हे शुढळेश्वर या तीर्थस्थळी तपश्चर्येस आले असा उल्लेख यांच्या आत्मचरित्रात आहे शिवाजी महाराजांच्या दरबारी बुवाजी सरदार म्हणून दाखल झाले. असताना घनघोर लढाई झाली खूप लोक मारले गेले हे पाहून त्यांना मनस्ताप झाला ते नोकरी सोडून वणी जिल्हा नाशिक येथे गेले तेथे त्यांनी सप्तशृंगी देवीची तपश्चर्या केली. त्यांना देवी प्रसन्न झाली.देवीने त्यांना भगवद्गगीता दिली,व त्यांना गुंडेगाव येथील डोंगरावरील शेवाळ तीर्थ वरील श्री शुढळेश्वर शिवालय येथे जाण्यास सांगितले देवीचे आशीर्वाद घेऊन बुवाजीबुवा गुंडेगाव येथे आले  व महादेवाची मनोभावे भक्ती केली.नंतर  भगवंताच्या आज्ञेवरून श्री संत सद्गुरु बुवाजी बुवा महाराज अरणगावी इ. सन १६८६ अश्विन वद्य नवमी या तिथीला दुपारी १२ वाजता समाधिस्थ झाले..




आजही त्यांच्या समाधीला जलाभिषेक करण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी गुंडेगाव येथील शेवाळ तीर्थ येथे पायी जाऊन कावडीने पाणी आणले जाते.व त्यांच्या समाधी वर जलाभिषेक केला जातो. व बुवाजी बुवांच्या यात्रेला प्रारंभ होतो.आज गुंडेगावचा निसर्ग रम्य शुढळेश्वर तीर्थक्षेत्र परिसर अनेक पर्यटकाचे श्रद्धास्थान असले तरी मनाला आनंद देऊन जाणारे स्थळ म्हणून नावारुपाला येत आहे.

close