shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईबाबा संस्थानने विद्यार्थ्यांची फी माफ करावी : कैलासबापू कोते..!!



शिर्डी शहर प्रतिनिधी :
कोरोनाच्या संकटामुळे शिर्डी आणि परिसरातील अर्थकरण पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असल्याने फीअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी साईबाबा संस्थानच्या शैक्षणीक संकुलात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात यावी, अशी मागणी शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी केली आहे. पत्रकात कोते यांनी म्हटले, की दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली शिर्डी आणि परिसर सापडला आहे. 

साईबाबा मंदिरावरच शिर्डीची अर्थव्यवस्था अवलंबून आहे; मात्र कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशाने साईबाबा मंदिर दीड वर्षापासून भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने शिर्डीसह परिसरातील अर्थकरण पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. शिर्डीतील लहानमोठे व्यावसाय अडचणीत आले आहेत. भाविक नाही तर व्यवसाय कसा करायचा? हा प्रश्न सर्वसामान्य व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे. 

बँकांचे कर्ज थकल्याने वसुलीसाठी त्यांचाही ससेमीरा पाठिशी लागला आहे. अशा परिस्थितित विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये, यासाठी काहीतरी धोरणात्मक निर्णय होण्याच्या प्रतिक्षेत पालक आहेत. 

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी कान्हुराज बगाटे यांनी एका वर्षात साईसंस्थान आणी शिर्डीच्या विकासासाठी निश्चित अशी घेतलेली भुमिका स्वागताहर्य आहे; मात्र मंदिर बंद असल्याने शिर्डी परिसरात ओढावलेल्या आर्थिक संकटात सर्वसामान्यांना मदतीचा हात देण्यासाठी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी साईबाबा संस्थानच्या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांचे शैक्षणीक शुल्क माफ होणे गरजेचे आहे असे कैलासबापू कोते यांनी म्हटले आहे.
close