शिर्डी शहर प्रतिनिधी :
आज १४ नं. वार्ड मध्ये गणेशवाडी, विठ्ठलवाडी, गोवर्धन नगर, प्रसादनगर या ठिकाणी विद्युत तारेवर झाडांच्या फांदया आलेल्या असल्यामुळे वाऱ्या मुले अनेक ठिकाणी भविष्यातया मुळे जिवितहानी होऊ शकते. त्या संदर्भात आज झाडांच्या फांद्या काढण्यात याव्या यासाठी आज सौरभ हाडवळे यांनी निवेदन देण्यात आले आहे.
मुख्यधिकारी यांनी लवकरात लवकर काढतो असे आश्वासन दिले आहे. यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले, अमृतराव गायके, ऍड. अविनाश शेजवळ, मा. नगरसेवक सुरेश आरणे, विद्यार्थी काँग्रेस शिर्डी शहर अध्यक्ष सौरभ हाडवळे, समीर शेख, योहान गायकवाड, कृष्णा गायकवाड, संतोष वाघमारे, पंकज कदम, आदित्य आरणे, शाकीर शेख, भुषण आरणे आदी कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


