shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कांग्रेसला निर्धन,निष्कलंक नेतृत्व हवे..!!

प्रतिनिधी : संजय वायकर

(दि .१९ ) :लोकमत एडिटोरीयल बोर्डाचे चेयरमन श्री विजय दर्डा पिढीजात कांग्रेस चे सदस्य आहेत.पण आजची अवस्था पाहून त्यांना नेहमीच खंत वाटते. पक्षशिस्तीचा बडगा असूनही ते आपली खंत लपवू शकत नाहीत. असे कान्याकोपऱ्यात नव्हे, चक्क  लोकमत मधे खंत व्यक्त करतात.प्रकाशित करतात.असे अनेकदा आम्ही वाचतो.पण अजूनही कांग्रेस ची मुर्छा जात नाही. शुद्धीवर येत नाहीत. मला प्रश्न पडतो,कोणते औषध कांग्रेस नेत्यांना पाजले कि सुंगवले, त्याचा परिणाम जाता जात नाही?धक्का मारणे,तोंडावर पाणी मारणे वगैरे प्रकार मी नेहमीच करतो.उलट ते त्याच अवस्थेत बडबडतात.काका,तुम्ही कांग्रेस बाबत असे लिहू नका.आम्हाला बरे नाही वाटत.



तरीही माझा अभ्यास चालूच आहे.काहीतरी कैलोमेल उद्देशपुर्ण किंवा चुकीने जास्त दिले गेले असेल.अनेस्थिकल डॉक्टर ने दिले कि,यांनीच बाटली ओतून घेतली?काहीतरी गडबड झालेली आहे.म्हणून काही नेते म्हणतात, काका,यावर काळ हाच इलाज आहे.ते अचानक नाही, आपोआप उतरेल. मग,येऊ आम्ही शुद्धीवर.बसू आम्ही गादीवर.यावरून माझा तर्क आधिक बळावतो.आणि म्हणून त्या गुंगी आणणाऱ्या औषधाचा शोध घेतो.


 कांग्रेस, राष्ट्रवादी किंवा सेना या पक्षातील नेत्यांकडे बिनाकष्टाची ,अनावश्यक, बेहिशेबी मालमत्ता  असल्याचे केंद्रीय सरकार मधील चाणाक्ष नेत्यांना पुरते कळलेले आहे. आम्हाला ही कळते पण आम्ही सणासुदीला यांच्या मंडपात जेवून येतो.पण केंद्र सरकारने त्यावर आधीच असलेला सरकारमान्य इलाज करणे सुरू केलेले आहे. त्या इलाज चे संक्षिप्त नांव आहे इडी.इडी चे नाव काढले कि,अनेकांना हुडहुडी भलते.नुसती नोटीस गेली तरी झोप उडते.बोलवणे आले कि,नेता अक्षरशः बडूबडू लागतो.रडू लागतो.लोळू लागतो.गयावया करतो.चोर तेथेचि जाणावा!

 "साहेब, मला वाचवा."मग,साहेब दिल्लीत जाऊन काहीतरी झाडाफुकी करून इडी ची तिव्रता कमी करतात.मारेंगे नही डरायेंगे!काटेंगे नही फुपकारेंगे!असे आश्वासन घेऊन परत येतात. तेंव्हा बाधित नेते साहेबांभोवती घुटमळतात.साहेब,माझे नाव कमी केले का?आता नाही बोलवणार का?असा उतारा देणे खूप चांगले काम आहे.एकनाथ महाराजांनी सुद्धा मनुष्य इंगळी चावल्यानंतर असाच काही उतारा सांगितला होता.

वाचकांचा गैरसमज झाला आहे.कि नेत्यांना भाजपचे विचार आवडले म्हणून ते कांग्रेस, राष्ट्रवादी, सेना सोडून भाजपत जात आहेत.मुळीच नाही. ते इडीच्या भीतीने भाजपत जात आहेत.वाघबाई,विखेबाबा,गावीतदादा,पाचपुते, सातपुते असे अनेकांना आपला पक्ष सोडून भाजपत जावे लागले.ते काही राजकीय धोरणाचा विरोध किंवा समर्थन हेतूने पक्षांतर करीत नाहीत. हे सरनाईक यांनी उघडपणे सांगितले आहे.दौलत ,उज्जत,शौहरत  बचानी हो तो भाजप से साठगांठ कर लो!


 मा.राहूल गांधींनी काल चांगले फर्मान काढले."जिसे इडी का डर लगता हो,वो आज कांग्रेस छोड दे!जिसे डर नही ,वो मेरे साथ रहे!"

व्वा!बहोत खुब!इतकी स्पष्टोक्ती खूप काळानंतर कानी पडली.शिकंदर कडून पराभव झाल्यानतर पौरव राजा म्हणाले होते," मला राजासारखे वागवा,."मला राहूल गांधी मधे तो अवतार दिसला. तो रूबाब दिसला.तो रूतबा दिसला.तो तजुर्बा दिसला.


कदाचित राहूल गांधींना कळले असेल,जाणवले असेल,किंवा कोणी सांगितले असेल कि,कांग्रेस ची कमजोरी चोरीत आहे.ज्यांनी चोऱ्या केल्यात,घबाड भरले,पोट फुगवले,अंग सुजवले त्यांना इडीची भीती खात आहे. म्हणून ते भाजप विरोधात काय, कोणाच्याही विरोधात बोलू शकत नाहीत. आपले दुकान काचेचे आहे तर इतरांच्या दुकानावर दगड मारत नाहीत. आता शिवसेना ही मारत नाही. त्यांचीही काचेची दुकाने थाटली गेलीत.छान चालू आहेत.म्हणून कांग्रेस चे मोठमोठे पुढारी,नेते मैदानात उतरत नाहीत, बोलत नाहीत. जनतेला दिसत नाहीत.बस्स,राहूल गांधी आणि इकडे एखादे नानाभाऊ पटोले.बाकी सर्व पॉलिटिकल स्क्रैब बनलेली आहे.नानाभाऊंच्या पायात अडकून गती रोकत आहेत.राहूल गांधी किंवा नानाभाऊ पटोलेंच्या रस्त्यातील  ही दगड धोंडे,मोडतोड भंगार  बाजूला सारण्याचे बळ राहूल गांधी किंवा नानाभाऊंकडे आले पाहिजे.

मुळातु कांग्रेस म्हणजे गांधीजी. गांधीजी म्हणजे कांग्रेस. हा इतिहास कोणीही पुसून काढू शकत नाही.गांधीजींनी सर्व पारंपरिक ऐश्वर्य झुगारून पंचा नेसून मैदानात उतरले.कफल्लक झाले.कपड्यांना खिसाच ठेवला नाही. त्यामुळे काही संग्रह करण्याचा प्रश्न उरत नाही. म्हणून गांधीजी पुर्ण यशस्वी ठरले.कांग्रेस यशस्वी झाली.आता तसेच निर्धन,कफल्लक,निष्कलंक नेत्यांची कांग्रेस ला गरज आहे.ज्याला इडी ची कधीही भीती वाटणार नाही. बेडीचीही भीती वाटणार नाही.


....शिवराम पाटील.

9270963122

जळगाव जिल्हा जागृत जनमंच. 

close