महसुल मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर उपोषणाचा इशारा- सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के..!!
प्रतिनिधी- संजय वायकर
दहीगाव (दि .१७) : नगर तालुक्यातील दहिगाव या ठिकाणी ऐतिहासिक श्रीराम मंदिर असुन या देवस्थान देखभाल साठी पब्लिक ट्रस्ट नेमणूक धर्मदाय आयुक्त अहमदनगर हे दर तिनं वर्षा पासून करत आहे.
या मंदिर देवस्थान जमिनीवर गावातील राजकीय तलाठी मंडळ अधिकारी यांच्या संगनमताने देवस्थान जमीन इनाम वर्ग ३ जमीन आहे. जमीनीच्या सातबारा उतारा व आठ उत्तर्यावर सामाईक क्षेत्र असे नाव लावलेले आहेत.देवस्थान जमीन मौजे दहिगाव, मौजे,साकत खुर्द, मौजे वाटेफळ, ईतर हक्कातील नावे आहेत.
या संदर्भात गेल्या २०१९ वर्षा पासून पाठपुरावा चालू होता सन २०२० मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण करण्यात आले. या संदर्भात सर्व पुरावे सादर करून संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो आदेश दिले होते.पंरतु कोरोना ची कारणे देत अडीच वर्षांचा कालावधी या प्रकरणात घातला यातील दोषींवर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
तसेच अडीच वर्षां पासून देवस्थान सातबारा मध्ये जे जे बदल साठी पाठपुरावा अर्ज स्मरणपत्र, तक्रार अर्ज, तिनं उपोषण हा सर्व घडामोडी नंतर हि यात मागणी नुसार बदल न केल्या मुळे येत्या २३ जुलै पासुन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थाना समोर उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी या लेखी निवेदन द्वारे दिला आहे.

