shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दुहेरी हत्याकांडाने पुणे जिल्हा हादरला, मध्यरात्री दोघांची दगडाने ठेचून हत्या..!!

पुणे:-दुहेरी हत्याकांडाने पुणे जिल्हा हादरला आहे. जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस गावातील तामखडा येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन तरुणांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने पाटस हादरले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


दौंडचे उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची माहिती समजल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.
close