shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिग्विजय बागल यांचे बाजार समिती सदस्य अपात्रतेवर २७ जुलै रोजी सुनावणी..!!

प्रतिनिधी : संजय वायकर:

करमाळा : (दि .२०) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य दिग्विजय बागल यांचे सदस्यत्व जगताप गटाचे युवानेते शंभुराजे जयवंतराव जगताप यांचे तक्रारीवरून पणन संचालक पुणे यांनी १८जुलै २०१९ रोजी रद्द केले होते . यावर दिग्विजय बागल यांनी पणनमंत्री यांचेकडे अपील केल्याने  १ वर्षानंतर १६ जून २०२० रोजी स्थगिती मिळवली होती . 



आता या प्रकरणी पणनमंत्री यांचे कार्यालयातील कक्ष अधिकारी ,सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांनी सुनावणी नोटीस काढली असून मंत्री पणन यांचेसमोर मंगळवार दि २७ जुलै रोजी सुनावणी होणार असून यावर लवकरच निर्णय होणार आहे.

close