सर्व सामान्यांचा" हक्काचा माणुस म्हणून आमदार निलेश लंकेची महाराष्ट्रात क्रेझ
प्रतिनिधी-रफिक शेख
बुलढाणा : (दि.३१) : कोरोना काळात हजारो रुग्णांना जीवनदान व मोफत उपचार असे राज्यात आदर्श काम शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केले असून एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आमदार झाल्याने "सर्व सामान्यांचा"हक्काचा माणुस म्हणून आमदार निलेश लंकेची महाराष्ट्रात क्रेझ झाली असल्याचे गौरवोद्गार राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी काढले आहे.शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात दौ-यावर होते.यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते आमदार निलेश लंकेना कोरोना योध्दा पुरस्कार पण प्रदान करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेगाव बुलढाणा आयोजित सत्कार कोरोना योद्धाचा औषध व अन्न प्रशासन कॅबिनेट मंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे औषध व अन्न प्रशासन कॅबिनेट मंत्री तसेच पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे लोकनेते आमदार निलेश लंके यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की निलेश लंके राष्ट्रवादीचे आमदार आहेत यांचा मला व माझ्या पक्षाला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्रात २४ तास ३६५ दिवस अहोरात्र जनतेची कामे करणारा एकमेव आमदार निलेश लंके आहेत.
माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार विचारातून फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रेरणेतून लंके हे काम करत आहेत.आमदार निलेश लंके हे संत नाही पण संत-महात्मे सारखे महान कार्य त्यांनी कोरोनाच्या काळात केले आहे. राज्य नव्हे तर संपूर्ण भारत देशात लंके यांनी तरुणाईच्या मनात जागा किती आहे राज्यातील तरुणांमध्ये मोठी क्रेझ तयार केली आहे. रस्त्यावरचा माणूस सामान्य माणूस म्हणून आमदार निलेश लंके यांची ओळख उभ्या महाराष्ट्रात झाली आहे असे गौरव उदगार ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या मनोगतामधून संत भूमी शेगावचे गजानन महाराज यांच्या भूमीत व्यक्त केले.यावेळी हजारोच्या संख्येने बुलढाणा जिल्ह्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी,ग्रामस्थ व माता-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक कार्याची भूरळ राज्यातील तरूणाईला पडली असून " सेल्फी आमदार" म्हणून आमदार.लंके यांची राज्यात ओळख निर्माण झाली आहे.तर दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे नामदार धनंजय मुंडे बारामती व विदर्भ मराठवाडा खानदेशातील तरूणाईची आमदार निलेश लंके मागणी असुन लवकरच या जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उतरविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे.

