shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिला अधिकार्‍याचा विनयभंग केल्याप्रकरणी शेवगावच्या तरुणावर गुन्हा दाखल..!!

शेवगाव: तालुक्यातील एका वरीष्ठ महिला अधिकार्‍याचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तालुक्यातील शासकीय कर्मचार्‍यांसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.


या महिला अधिकार्‍याने आरोपी विरोधात पोलिसांत तक्रात दिली होती. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर विशाल विजयकुमार बलदवा (रा. मारवाड गल्ली, शेवगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत दिलेल्या फिर्यादीत महिला अधिकार्‍याने म्हटले आहे की, गेल्या काही महिण्यापासून अश्लिल शेरेबाजी करणे, बदनामी करणे, अश्लिल मेसेज पाठविणे तसेच कार्यालयीन कक्षात एकटी असतांना येण्याचा प्रयत्न करणे. त्याला विरोध केला असता खोट्या तक्रारी करून आंदोलने करत असल्याचे म्हटले आहे.

तसेच विशाल बलदवा हा फोन करून तसेच कार्यालयात चकरा मारून ओळख वाढविण्याचा प्रयत्न करत असे. अवैध धंदे सुरु करण्यासाठी मी आपल्याला मदत करतो. या माध्यमातून येणारे पैसे मी तुम्हाला पोहोच करत जाईल, असे म्हणुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असे.

त्याचप्रमाणे माझ्यावर पाळत ठेवून तुम्ही ड्रेस घालतात त्यामुळे छान व फ्रेश दिसतात, अशी शेरेबाजी करत होता. याबाबत संबधित अधिकार्‍याने कार्यालयीन कामासंबधीच बोलावे, असे सांगितले होते. मात्र त्याने पाठलाग चालु ठेवत कामांमध्ये ढवळाढवळ करू लागला. एवढेच नव्हे तर आपल्या विरोधात तक्रारी करून व फोन करून त्रास देत होता. बलदवा याने उपोषणासाठी फलक छापून त्यावर विचित्र फोटो छापून अधिकार्‍यांची बदनामी केली. तसेच पती व मुली बद्दलही बाईट बोलून त्यांनाही चुकीची व बदनामीकारक माहिती देत, मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.    या महिला अधिकार्‍याने शेवगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सपोनि. सुजित ठाकरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यात तथ्य आढळून आल्यानंतर आज मंगळवारी विशाल बलदवा याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.                       

बातम्या आणि जाहिराती करीता संपर्क दिपक हरिश्चंद्रे , (तालुका,प्रतिनिधी )7350591600
close