नगर तालुक्यातील प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा उभारणार -सा.पोलिस निरिक्षक राजेंद्र सानप...
नगर- प्रतिनिधी:- (शिवा म्हस्के)
नगर तालुक्यातील कामरगाव हे नगर-पुणे रोड लगत वसलेले गाव या ठिकाणी कायमचं गावच्या आसपास अपघात होत असतात. या अपघातग्रस्त व्यक्तींना तातडीने मदत पोहचण्याचे काम गावातील तरूण ग्रामस्थ नेहमी करत असतात.या अपघातग्रस्त व्यक्तींना तात्काळ मदत मिळते.
ईथुन मागल्या छोट्या मोठ्या चोरट्यांचा अभ्यास करता गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा उभारणं खुप गरजेचं होतं. पंरतु कोरोना काळात ते करणं शक्य होतं नव्हते परंतु आता कोरोना आजारा प्रादुर्भाव कमी झाल्याने कामरगावचे संरपच तुकाराम कोतारे नगर तालुका पोलिस स्टेशन सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा महत्व व कार्य समजावुन सांगितले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते ग्राम सुरक्षा यंत्रणा शुभारंभ करण्यात आला. या वेळी या ग्राम सुरक्षा नोंदणी करण्यात आली या ठिकाणी पाचशे व्यक्तींची नोंद झाली.
या वेळी प्रमुख उपस्थिती नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे हि उपस्थित होते. संरपच तुकाराम कोतारे तसेच उप पोलिस निरिक्षक जरावाल, तसेच ग्रामपंचायत सदस्य, आदी ग्रामस्थां गावातील तरुण उपस्थित होते.

