shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कु. धनश्री धनराज विसपुते (नवीन पनवेल) हिस अमेरिकेतील नाँर्थ ईस्टर्न विद्यापिठ,बोस्टन येथील एम. एस.(Master Of Science) पदवी बहाल..!!

 राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी:- 

नवी मुंबई सुवर्णकार मंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान कार्याध्यक्ष आणि आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन दादासाहेब श्री. धनराजजी विसपुते(नवीन पनवेल) आणि नवी मुंबई सुवर्णकार महिला मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा व आदर्श शैक्षणिक समुहाच्या सचिव सौ.संगिताताई धनराज विसपुते यांची सुकन्या  कु धनश्री धनराज विसपुते हिने  अमेरिकेतील नाँर्थ ईस्टर्न विद्यापिठ, बोस्टन येथील एम. एस.(Master Of Science) ही पदवी नुकतीच प्राप्त केली आहे.



या सुवर्ण कन्येने यशाचे शिखर गाठल्यामुळे आपल्या आई वडीलांचे स्वप्न साकार केले आहे.या यशाबद्दल नातेवाईक,आप्तेष्ट ,नवी मुंबई् सुवर्णकार मंडळाचे पदाधिकारी,  आदर्श शैक्षणिक समुहाचे कर्मचारी यांचेकडून  समाजस्तरावर सर्वत्र कौतुक होत आहे. 

 कु.धनश्रीच्या  यशा प्रित्यर्थ आदर्श शैक्षणिक समुहातर्फे "पर्यावरणाचा वसा" हे ध्येय ठेवून वृक्षारोपण तसेच वृक्षसंगोपनचा वसा घेऊन "पर्यावरण संरक्षण व संवर्धन करु आणि सामाजिक वारसा जपू!" असा निर्धार केला असून वर्षा ऋतुत आदर्श शैक्षणिक समुहातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

close