shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोयनाड मधील नागरिकांचे MSEB ला निवेदन,दोन दिवसात लाईट सुरू करण्याचे MSEB ने दिले आश्‍वासन..!



विनया म्हात्रे-मेढेकर । रायगड :

पोयनाड गावातील रस्त्यावरचे रात्र दिवे ( straight lights )गेले कित्येक महिने बंद आहेत आणि मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे अंधारात दिसत नसल्याने अपघात होत आहेत तसेच रात्री अपरात्री होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढलेले आहे,आज दि. २४ जुलै रोजी मा. श्री. वाघमारे साहेब सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालय (MSEB,) पोयनाड यांना या बाबत निवेदन देण्यात आले. 

रस्त्यावर रात्र दिवे बंद असल्याने गावात पोयनाड बाजारपेठ, चवरकर आळी, रामआळी याभागात आठ ठिकाणी चोऱ्या झालेल्या असून यामुळे सर्व सामान्य जनता व्यापारी वर्ग यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तरी त्यावरील उपाययोजना करून त्वरीत लाईट लावण्यात यावी. 
  
यासाठी गावाचे सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सरपंच श्री. भुषणजी चवरकर,व्यापारी असोसिएशनचे श्री. हितेशजी जैन, श्री. बबलू अगरवाल, सामाजिक कार्यकर्ते श्री. बाळा टेमकर, श्री. अमोलजी खैरनार, श्री. बाबू चवरकर, श्री. शैलशजी गायकवाड, श्री. बंटी टेमकर, श्री. निकीत टेमकर, कला क्षेत्रातील श्री. राजेंद्र जाधव, श्री. संतोष चवरकर, श्री. महेश म्हात्रे, श्री. नितेश पाटील , श्री. राकेश जाधव निवेदन देण्यासाठी  हे सर्वजण उपस्थित होते. 
  
जर दोन दिवसात बसविलेल्या लाईट सुरू केल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल याची संबंधित अधिकारी वर्गाने व MSEB खात्याने  नोंद घ्यावी अशी विनंती केली. सदर विनंतीला मा. श्री. वाघमारे साहेब यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि दोन दिवसात लाईट सुरू करतो असे आश्र्वासन देण्यात आले आहे.
close