एसटी खाजगीकरण विरोधात लढा...
प्रतिनिधी : आसावरी वायकर
जळगाव : (दि .२४ ) : परिवहन मंत्री ने एसटी चे खाजगीकरण सुरू करण्याचा सपाटा लावलेला आहे.तो एसटी तोट्यात आहे म्हणून नव्हे तर एसटी ची प्रत्येक शहरातील मध्यवर्ती जागा बळवण्याच्या हेतूने. त्यासाठी काहीही गाजर दाखवो पण गाजर मंत्री खाणार आणि कर्मचारी पाल्याची पुंगी वाजवणार.ठाणे येथील अशी सुरुवात पार्किंगच्या निमित्ताने सुरू झाली आहे.पण शॉपिंग चा डाव आहेच.
एसटी ही कमर्शियल इन्स्टिट्यूट नाही .ती सेवाभावी संस्था आहे. म्हणून तोटा झाला तरी तो सरकारने भरून काढायचा आहे. जर शेतकरी कर्जबाजारी झाला तर दर दोन वर्षात दोनदा कर्जमाफी दिली.का?शेती तोट्यात होती म्हणून ना!तर मग,एसटी तोट्यात गेली तर कर्जमाफीच्या १०%पैसा का पुरवू नये? पण परिवहनमंत्री ला शेतात शॉपिंग टाकता येणार नाही. शेतकरी बैलाच्या काठीने झोडपून काढतील.एसटी नोकर नाही झोडपणार.म्हणून असा दुष्ट प्रयत्न केला जात आहे. मंत्री चा ,सरकार चा हेतू दुष्ट आहे.निर्णय चुकीचा आहे.का सहन करून घेत आहात?
एसटी सत्तर वर्षापासून अविरत धावत आहे. आणि हे लकडी मकडी सरकार तर आता निर्माण झाले. मंत्रालयाची चाबी दिली तर तिजोरी लुटुन न्यायची का?हिच का छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण? नाही हा,रयतेचा विश्वासघात आहे.छत्रपतींना हे मान्य नाही. रयतेला मान्य नाही. म्हणून हे मंत्री नको.हे सरकार नको,म्हणण्याची वेळ आलेली आहे.
पुणे येथे एसटी संघटनांची बैठक होत आहे.
आपल्या संघटनेने सुद्धा एसटी खाजगीकरणाच्या विरोधात भुमिका घ्यावी. आपण कोणत्याही पक्षाशी संलग्न असलो तरी नेतृत्व एसटी कर्मचाऱ्यांचे करीत आहोत.आपल्या समस्या वेगळ्या आहेत म्हणूनच आपली संघटना पक्षा पेक्षा वेगळी आहे.तिचे आस्तित्व टिकवून ठेवणे आवश्यक आहे.
पक्ष सत्तेत येईल आणि जाईल ही. पण आपली संघटना कायम सत्तेत असते.कर्मचाऱ्यांच्या विश्वासावर ,पाठबळावर, वर्गणीवर.हे शास्वत सत्य कोणत्याही नेत्याने नाकारू नये.धिक्कारू नये.विश्वास जिंकलेला आहे तर कायम टिकवून ठेवणे आवश्यक आहे. ही आपली परीक्षा आहे.सत्वपरीक्षा आहे.कर्म आपल्या हाती आहे. निकाल कर्मचाऱ्यांच्या हाती आहे.
निर्धास्त राहू नका.खाजगीकरणाची धास्ती घेतली पाहिजे.
...शिवराम पाटील.
9270963122
महाराष्ट्र जागृत जनमंच.

