shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुरुड तहसिलदार गमन गावीत हे लाच लुचपत च्या जाळ्यात..! नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..! 15 हजारांची घेतली लाच..!!



मुरुड ।  प्रतिनिधी (सारीका माळि,शिदे):

भष्ट्राच्यार दिवसें दिवस वाढत आहे ... लोक झटपट  श्रीमंत होण्याकरता कुठला ही मार्ग अंवलबतात ..त्यातला ऐक मोठा मार्ग म्हणजे भ्रष्टाचार .. असाच मार्ग वापरल्या मुळे  मुरुड तसिलदार यांना कुळ वहिवाट कायद्याच्या जमिन फेरफार करण्यासंदर्भात 15 हजारांची लाच स्विकारताना  मुरुड तहसिलदार गमन गावीत यांच्यासह संदेश वाळंज  शिपाई  रेमनाथ पाटील शिपाई दोन कर्मचार्‍यांना नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे.



याबाबतचे वृत्त असे की, तक्रारदाराला आपल्या जमीनीच्या विक्रीसाठी त्यावर असलेले कुळ वहिवाटीचे 32 ग प्रमाणपत्रासाठी मुरुड तहसिलदार तथा शेतजमिन न्यायधिकार प्राधिकरणकडे मागणी करण्यात आली होती. त्यासाठी तक्रारदाराकडे मुरुड तहसिलदार गमन गावीत यांनी 15 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने थेट नवीमुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधत तक्रार केली.


 त्यानुसार या तक्रारीची खातरजमा करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबईचे पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. बुधवार दि. 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान तक्रारदाराकडून 15 हजार रुपयांची लाच घेताना या पथकाने तहसिलदार गमन गावीत यांच्यासह कर्मचार्‍यांना रंगेहाथ पकडले. सदर प्रकरणाबाबत गुन्हा नोंदविन्यात आला असुन तहसिलदार याचे सांगणेवरुन  शिपाई संदेश संदानद वाळज  यांनी तक्रारदार याचे कडे 15000 रक्कमेची मागणी केली .त्या अनुंषगाने दिनांक ११/८/२०२१रोजी तहसिलदार गमन गावीत याच्या सांगण्यावरुन शिपाई रेमनाथ शाम पाटिल यानी तक्रारदार कडुन लाचेची रव्कम स्विकारताना मिळून आला आहे.पुढिल तपास सुरु असुन ऊद्या मा. न्यायालयात आरोपीना रिंमाड करता हजर केले जाईल.
close