shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदर्श विद्यामंदिर सोनई 15 ऑगस्ट दिन साजरा..!!

प्रतिनिधी, मोहन शेगर, सोनई 
आदर्श विद्यामंदिर सोनई या शाळेत कोरोणा चे नियम पाळून 15 ऑगस्ट दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला मा.रामचंद्र कर्पेसाहेब. (पी.एस.आय.सोनई पोलिस स्टेशन),मा. डाॅ.राजेंद्र पाटोळे. आरोग्य सेवक  यांच्या अध्यक्षतेखाली,मा प्रदिप शेठ बाफना  प्रमुख उपस्थितीत, मा.मुख्याध्यापक. श्री. खेसमाळसकर भाऊसाहेब, प्राथमीक मुख्यध्यापक अनिल दरंदले. बहुसंख्य पालक,शिक्षक वृंद.यांच्या 75 वा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहन समारंभ संपन्न झाला. 



या कार्यक्रमामध्ये मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये बक्षीस मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक भाऊसाहेब खेसमाळसकर यांनी सर्वांनी कोरोणाचे नियम पाळण्यास संदर्भात सूचना देऊन सध्याच्या परिस्थितीत आपण सर्वांनी कशी काळजी घ्यावी व सध्याच्या परिस्थितीचा आढावा देत  सकट समयी सर्व नियमांचे पालन करावे असे मार्गदर्शन केले.
close