प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: (दि.१७ ) : महाराष्ट्राच्या बँकिंग क्षेत्रात अग्रेसर तत्पर सेवा सुविधा देणाऱ्या ज्योती क्रांती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या वतीने दिनांक 16 ऑगस्ट 2021 रोजी क्यू आर कोड सर्विस चा लोकार्पण सोहळा ज्योती क्रांतीच्या करमाळा शाखेत पार पडला. या कोरोना व लॉकडाऊन काळात लोकांच्या सेवेसाठी दैनंदिन व्यवहार सोयीस्कर होण्यासाठी संस्थेच्या वतीने क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करण्यात आली.
ज्योती क्रांती बँकेच्या क्यूआर कोड लोकार्पण सोहळा प्रसंगी उद्घाटक म्हणुन यश कल्याणी सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश भाऊ करे पाटील,करमाळा नगरसेवक
डॉक्टर श्री अविनाश घोलप, डॉक्टर श्री तुषार गायकवाड, डॉक्टर श्री. बिपिन परदेशी, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन साखरे, शिर्डी एक्सप्रेसचे पत्रकार श्री .सूर्यकांत होनप, श्री.संग्राम देशमुख, श्री.बलराम परदेशी,निवृत्त शिक्षक श्री सतीश राठोड सर,खातेदार व प्रसिद्ध व्यापारी अ. नगर श्री.अरविंद राठोड,व पुणे राठोड समाज शहर अध्यक्ष श्री.किशोर राठोड, खातेदार व व्यावसायिक श्री.संतोष टांगडे,शाखेचे सर्व कर्मचारी, दैनिक ठेव एजंट, प्रेरक आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले आणि क्यू आर कोड च्या प्रतिकृतीचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यालय अधिकारी माननीय श्री रफिक शेख सर यांनी क्यू आर कोड व आधुनिक बँकिंग सेवा सुविधा बाबत उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी सर्व मान्यवरांचे ज्योतिक्रांती परिवाराकडून स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या पारदर्शक कारभाराचे व नाविन्यपूर्ण आधुनिक योजनांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम प्रसंगी ज्योतिक्रांती मल्टिस्टेट चे व्यवस्थापक श्री. किरण वरपे सर व संस्थेचे हितचिंतक व स्नेही श्री. भास्कर हजारे सर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.करमाळा शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .शाखा विकासक श्री . अमोल राठोड आणि शाखाधिकारी पंकज ढाळे यांनी सर्वांचे आभार मानले.

