राजेश्वरी कोठावळे यांनी पूरग्रस्त भागात जाऊन केली मदत
अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या वतीने राबविला उपक्रम..
अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मदत झाली होती जमा
आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक कामाची प्रेरणा
मायाताई रोकडे राजेश्वरी ताईंच्या पाठीमागे खंबीर उभ्या..
पारनेर । प्रतिनिधी :
लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक विचार प्रेरणेतून काम करत असलेल्या अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे या नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत आहेत. महाराष्ट्रात संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदत करणे आपले प्रथम कर्तव्य आहे. ही सामाजिक भावना मनात ठेवून त्यांनी पूरग्रस्त भागाला मदत करण्याचे ठरविले. व अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या वतीने मदतीचे आवाहन केले.
जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात मदत जमा झाली. लहान मुलांचे कपडे महिलांच्या साड्या तसेच धान्य तांदूळ गहू ज्वारी बाजरी व किराणा वस्तू यांचे मोठ्याप्रमाणात संकलन राजेश्वरीताई कोठावळे यांच्या माध्यमातून करण्यात आले. यामध्ये पारनेर तालुक्यातील आमदार निलेश लंके यांचे सहकारी म्हसोबाझाप ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच प्रकाश गाजरे, वडनेर बुद्रुक ते संजयदादा बाबर व अंकुशदादा बाबर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रवींद्र गायखे, पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस निलेश पठारे, उद्योजक सुधीर इंगळे तसेच पारनेर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या नेत्या मायाताई रोकडे राष्ट्रवादी युवती पारनेर तालुका अध्यक्ष पुनमताई मुंगसे, सुपा ग्रामपंचायत सदस्या सुरेखाताई पवार उद्योजिका स्वातीताई इंगळे, मयुरी झरेकर, संजय गाडीलकर, यांनी मोठा सहभाग घेत. मदत निधी जमा करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले.
कोकणातील चिपळूण या पूरग्रस्त भागात जाऊन राजेश्वरी ताई कोठावळे व सहकाऱ्यांनी अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या वतीने एक हजार पूरग्रस्त कुटुंबांना मदत पोहोचवली आहे. त्यांच्या या कामाचे आता कौतुक होत असून पूरग्रस्त भागातील बांधवांपर्यंत मदत पोचवून खऱ्या अर्थाने अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
दरम्यान पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील पूरग्रस्त भागाला मदत पोचवून राजेश्वरीताई कोठावळे यांनी सामाजिक कामाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने संघर्षकन्या ही ओळख निर्माण केली ती सार्थ ठरवली आहे.
पारनेरचे आमदार निलेश लंके यांची राजेश्वरीताई कोठावळे यांना सामाजिक काम करत असताना नेहमी प्रेरणा मिळत आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांचे जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे यांना नेहमी सकारात्मक सामाजिक मार्गदर्शन असते.
पूरग्रस्त भागातील एक हजार कुटुंबांना मदत..
राजेश्वरीताई कोठावळे यांनी आवाहन केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वस्तू स्वरूपात मदत मदत जमा झाली. ही मदत कोकणातील चिपळूण या ठिकाणी स्वतः आपल्या सहकार्यांसमवेत घेऊन जात 1000 कुटुंबानं पर्यंत ही मदत पोहोचवण्याचे काम जिल्हाध्यक्षा राजेश्वरी ताई कोठावळे यांनी केले आहे.
आमदार निलेश लंके यांना राजेश्वरीताईंचा अभिमान...
सामाजिक कामाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे या नेहमीच पुढे येऊन चांगले काम करत आहेत. आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक कामाची त्यांना प्रेरणा मिळत आहे. जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे या आमदार निलेश लंके यांना आपला मोठा भाऊ मानतात. राजेश्वरी कोठावळे करत असलेल्या कामाचा लोकनेते आमदार निलेश लंके यांना अभिमान वाटतो आहे. असे त्यांनी बोलूनही दाखवले आहे.
मायाताई रोकडे राजेश्वरी ताईंच्या पाठीमागे खंबीर उभ्या.. !
युवती जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे सामाजिक काम करत आहेत कोरोनाच्या काळातही त्यांनी उत्तम असं कार्य केले तसेच आता पूरग्रस्त भागात कोठावळे या मदत निधी पोहोचवून आपले कर्तव्य बजावत आहे. परंतु या सर्व कामांमध्ये त्यांना अगदी बहिणीप्रमाणे पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांच्या युवती सहकारी कर्जुले हर्या येथील मायाताई रोकडे या मदत व सहकार्य करत आहेत.
....

