shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खोरोची येथील शंकर नगरे यांच्या घरातील सर्व संसार आगीच्या भक्ष्यस्थानी.. ६ लाख ५१ हजार ३०० रुपये इतके नुकसान.सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

खोरोची येथील शंकर नगरे यांच्या  घरातील सर्व संसार आगीच्या भक्ष्यस्थानी.. ६ लाख ५१ हजार ३०० रुपये इतके नुकसान.

सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
तेज पृथ्वी ग्रुप च्या वतीने प्राथमिक स्वरूपात दिले कुटुंबास आधार.

इंदापूर प्रतिनिधी: कोरोनाच्या काळात गेली दोन वर्षापासून अनेक आव्हानांना तोंड देत कसाबसा संसार चालवत असतानाच मासेमारीचा व्यवसाय करणारे आणि अल्प शेती धारक शंकर बाबू नगरे राहणार खोरोची यांच्या घरावर १६ ऑगस्ट रोजी रात्री गाढ झोपेत असताना विजेच्या शॉर्टसर्किटने घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही.
धुराच्या लोटा मुळे घरातील कोणतेच साहित्य बाहेर काढता न आल्याने या घरातील सर्व सदस्य उघड्यावरती पडले आहेत.
सदर घटना समजताच वीज बंद करून घरातील साहित्य पाण्याच्या द्वारे विझवण्याचा प्रयत्न केला .परंतु मोठ्या प्रमाणात आग लागल्याने कोणत्याही प्रकारचे साहित्य हाती लागले नाही . 
सदर घटनेचा पंचनामा दिनांक १८ ऑगस्ट रोजी तलाठी राजाभाऊ पिसाळ यांनी सकाळी १०:३० वाजता केला .  शंकर बाबू नगरे यांच्या जमीन गट नंबर ६५८ मध्ये राहते घर असून दिनांक १६ ऑगस्ट २०२१ रोजी अचानक विजेच्या शॉर्टसर्किटमुळे  आग लागली व घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू या आगीत जळून नष्ट झालेले आहेत यामध्ये एकूण ६ लाख ५१ हजार ३०० रुपये इतके नुकसान झालेले आहे. या तलाठी पंचनामा वेळी पोलीस पाटील भागवत जाधव, आदिनाथ भिमराव कदम, सतीश आबा हेगडकर, राजीव माणिक भाळे, दुर्योधन महादेव पाटील हे उपस्थित होते.

तसेच सदर घटनेची तीव्रता पाहता खोरोची गावातील तेज पृथ्वी ग्रुपचे नानासाहेब खरात यांनी दिनांक १८ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता फुल नाहीतर फुलाची पाकळी या तत्त्वानुसार सदर कुटुंबातील सदस्य यांना कपडे किराणा साहित्य व फळे देऊन  आधार दिला.
यावेळी खरात म्हणाले की, सदर घटना अतिशय दुर्दैवी असून नगरे यांचा संपूर्ण संसार विजेच्या शॉर्टसर्किटने जळाला असून सदर कुटुंबाची मोठी हानी झाली आहे आहे .या परिस्थितीत मी माझ्या ग्रुपच्या वतीने आधार दिला आहेच. परंतु शासनाने सर्वस्तरातून या कुटुंबासाठी तातडीने मदत करून त्यांच्या या परिस्थितीस हातभार लावावा. तसेच तालुक्यातील दानशूरांनी या घटनेची परिस्थिती पहात या कुटुंबास मदतीचा हात देणे गरजेचे  आहे असे आवाहनही त्यांनी केले. सदर कुटुंबातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून यामध्ये सर्व कागदपत्रे ही जळून खाक झाली आहे. त्यामुळे शासनाने विना अट तातडीने सदर कुटुंबास मदत करावी अन्यथा तेज पृथ्वी ग्रुपच्या वतीने सदर कुटुंबास मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असे नानासाहेब खरात यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तेज पृथ्वी ग्रुपचे सदस्य गणेश शिंगाडे, महेश शिंदे, सोमनाथ वाघमोडे ,भालचंद्र वाघमोडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
close