पिंपरी चिंचवड:-पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आर्थिक निर्णय घेणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर आज (बुधवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने छापा टाकला. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. महापालिका इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार पडली. सभा संपल्यानंतर पाचच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तळमजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर आणले. दालन बंद करून घेत त्यांची चौकशी सुरू आहे आहे. पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
त्यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, तक्रार नेमकी कोणी केली. याबाबत अद्याप समजू शकले नाही.

