shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांचा दिल्लीकडे वाढता कल... तर जनता चर्चेतून करती हलचल

हर्षवर्धन पाटील यांचा दिल्लीकडे वाढता कल... तर जनता चर्चेतून करती हलचल .

इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वीस वर्ष काम पाहणारे एक अभ्यासू आणि सर्व पक्षातील नेत्यांशी सलोखा असलेले नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांच्या अभ्यासात्मक नेतृत्वाचा फायदा भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणासाठी उपयोग करून घेत आहे की काय? हे दिल्लीतील अमित शहा यांच्या भेटीवरून स्पष्ट होत आहे .
 जरी ही भेट केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या अभिनंदनाची असली तरी यावेळी माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांच्या बरोबर असणे तसेच सहकाराची नाळ असलेले हे दोन्ही नेते काँग्रेस मधून भाजप मध्ये गेलेले असून ते    
 अमित शहा यांच्या भेटीला जातात आणि अमित शहा हे   संसदेचे अधिवेशन चालू असताना  
आपल्या व्यस्त कार्यक्रमातून या दोन्ही नेत्यांना वेळ काढून भेटून सखोल चर्चा करतात. यावरून भाजपच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील दमदार नेत्याला उभारी देण्यासाठी काही नियोजन होत आहे की काय? तसेच सध्या केंद्र शासनाने सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे .त्यासाठी सहकारातील अनुभवी जाणकार नेत्यांची गरज लक्षात घेता हर्षवर्धन पाटील यांच्या नावाबद्दल जनतेमध्ये चर्चा चालू आहे.

सध्या इंदापूर तालुक्यात येणाऱ्या निवडणूका पाहता या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांना सक्षम साथ देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने साथ देत हालचाल करीत आहे ते इंदापूर तालुक्यातील जनता पाहात असून त्या वरती चर्चा चालू असल्याचे दिसून येत आहे.

सध्या राष्ट्रपती नियुक्त खासदार यांची मुदत संपत आली  असून यामध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची वर्णी लागते की काय याची चर्चा चालू आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या हालचालीवरून दिसत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेससमोर एक आव्हान उभे करायचे असेल तर हर्षवर्धन पाटील यांना ताकद देणे गरजेचे आहे. यावरून हर्षवर्धन पाटील दिल्लीकडे वारंवार जात असल्याने जनतेमध्ये हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवीन जबाबदारी कोणत्या माध्यमातून मिळते  अशा चर्चेची हलचल जनतेत चालू आहे.
close