shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षकांच्या विविध प्रलंबीत मागण्या पुर्ततेसाठी पुणे जिल्हा एकल शिक्षक सेवा मंचाचे वतीने जिल्हा परिषद पुणे येथे पदाधिकारी व अधिकारी यांना निवेदन सादर.

शिक्षकांच्या विविध प्रलंबीत मागण्या पुर्ततेसाठी पुणे जिल्हा एकल शिक्षक सेवा मंचाचे वतीने जिल्हा परिषद पुणे येथे पदाधिकारी व अधिकारी यांना निवेदन सादर.
इंदापूर प्रतिनिधी:दि ९ जिल्हा परिषद पुणे याठिकाणी जिल्हा एकल शिक्षक सेवा मंच शाखेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे व शिक्षणाधिकारी श्रीमती गौड  यांना शिक्षकांच्या अनेक दिवसापासून प्रलंबीत असणाऱ्या विविध मागण्या तात्काळ पूर्ण करण्यासाठी निवेदन देवून सविस्तर चर्चा करण्यात आली.
केंद्रप्रमुख,पदवीधर शिक्षक,मुख्याध्यापक पदावरील प्रमोशन प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी.
मुख्याध्यापक रिवर्षण प्रक्रियेविषयी योग्य निर्णय घेऊन प्रमोशन प्रक्रिया राबवावी.
शास्त्र पदवीधर रिक्त पदांवर बारावी शास्त्र उत्तीर्ण शिक्षकांस नियुक्ती देऊन त्यांची शैक्षणिक प्रक्रिया (Bsc.Bed) खात्यामार्फ़त पूर्ण करावी,समाजशास्त्र पदवीधर शिक्षकांविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा.
म न पा पुणे मध्ये समाविष्ट ३५ गावातील शिक्षकांस म न पा कडे वर्ग करावे.
विस्थापित व रँडम राउंडमधील बदल्याना प्राधान्य द्यावे.
कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्या संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा
शिक्षक उपस्थिती बाबत संपूर्ण जिल्ह्यात एकवाक्यता असावी.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील १८६ शिक्षकांस देय असलेली वेतनवाढ देण्यात यावी.
२५ जानेवारी २०२१ च्या आदेशानुसार खातेप्रमुखांचे अधिकार पुन्हा देण्यात यावेत
वरिष्ठ वेतन,स्थायित्व, फंड,मेडिकल,यासह इतर प्रस्ताव तात्काळ मंजूर व्हावेत

यासह अनेक मागण्या करण्यात आल्या. निवेदन प्रसंगी शिक्षणाधिकारी गौड मॅडम यांनी ऑगस्ट अखेर सर्व शिक्षक संघटनाची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात येईल असे सांगितले.गौड मॅडम यांचा सत्कार  एकल शिक्षक सेवा मंच च्या वतीने करण्यात आला.*

यावेळी जिल्हा अध्यक्ष दादाभाऊ खेसे,संजय राळे,काळूराम तांबे,शरद राळे पाटील,महादेव कोंडभर,सुलेमान जहागीरदार,बबनराव गावडे,अशोक सावंत यासह अनेक एकल शिक्षक बांधव उपस्थित होते.अशी माहिती इंदापूर तालुक्याचे प्रसिद्धीप्रमुख भारत ननवरे यांनी दिली.
close