shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवकवींनी दर्जेदार साहित्य निर्मीतीचा ध्यास धरावा :-डाॕ.दयानंद काळे..!!



पुनाळ । प्रतिनिधी :कमी शब्दात समाजाभिमूक नवयुकांना व नवकवींना  प्रेरणादायी नवचेतना युक्त दर्जेदार काव्य निर्मितीसाठी मराठी साहित्य महासभेच्या माध्यमातून प्रेरित करणार असे गौरव उ्दगार गझलकार डाॕ.दयानंद काळे यांनी  सावर्डे तर्फ असंडोली (ता.पन्हाळा) येथे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन  व मराठी साहित्य महासभा या संस्थेच्या उद्गाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन  गझलकार डाॕ.दयानंद काळे हे बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष कवी रामहरी वरकले यांनी केले. प्रास्तविकव स्वागत  कवी दिपक नागवंशी सुत्रसंचालन प्रेम कवी परशुराम कांबळे यांनी केले.आदिवासींचे जननायक बिरसा मुंडा,व राघोजी भांगरे या महान क्रांतिकारक विषयी कवी सुरेश वडर,रामहरी वरकले,परशुराम कांबळे (कोतोलीकर), विनोद पोवार,धोंडीराम भोसले,विक्रम राजवर्धन,सागर कांबळे,संभाजी चौगले,यांनी नव युवकांना स्फुर्तिदायक काव्य रचना सादर केल्या.कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे कवी संभाजी चौगले हे होते.

या कार्यक्रमास पश्चिम पन्हाळा पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार पी.व्ही.पाटील,माजी अध्यक्ष सरदार काळे,कुंभी साखर कारखान्याचे संचालक आबा रामा पाटील,संघर्ष बहूजन सेनेचे राज्य सचिव रमेश कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष सात्ताप्पा पोवार,अरुण पोवार,यासह आदी काव्य रसीकजन उपस्थित होते.आभार सुरेश वडर यांनी मांडले.

काव्यातून विचार मांडातांना डाॕ.दयानंद काळे
close