हर्षवर्धन पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त अष्टविनायक कोविड योद्धा” हा पुरस्कार वितरण संपन्न.
निमगाव केतकी: महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त कोविड सेंटर उभारणीसाठी व सेंटर चालू राहण्याकरता परिश्रम घेत रुग्णांची सेवा केल्याबद्दल मान्यवरांचा “अष्टविनायक कोविड योद्धा” हा पुरस्कार वितरण तसेच पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री खासदार गिरीश बापट यांच्या निधीतून पंधरा लाख रुपये संत सावतामाळी देवस्थानसाठी देण्यात आले यामध्ये सुशोभीकरनाचे उद्घाटन समारंभ दिनांक १५ ऑगस्ट रोजी संत सावतामाळी कार्यालय निमगाव केतकी येथे संपन्न झाला.
“कोविड काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता ज्या लोकांनी रुग्णांची सेवा केली तसेच हे कोविड सेंटर चालण्यासाठी ज्यांनी सतत परिश्रम घेतले व कोविड सेंटर चालण्यासाठी आवश्यक गोष्टींची मदत ज्यांनी केली अशा लोकांचा सत्कार करण्यात वाढदिवसापेक्षा जादा आनंद आहे असे मत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निमगावकेतकी येथील कार्यक्रमात केले.
डॉक्टर्स नर्स ,आशा वर्कर्स, सामाजिक संघटना पोलीस व प्रशासन यंत्रणा या सर्वांनी जीव धोक्यात घालून लोकांचे जीव वाचवून मनुष्यहानी थांबवली असे मत हर्षवर्धन पाटील यांनी केले. यावेळी अकलूजचे डॉक्टर इनामदार यांचे विशेष कौतुक करताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की डॉ.इनामदार यांच्या रूपात खरोखर देव पाहिल्यासारखे वाटते कारण डॉक्टरांनी हजारो लोकांचे जीव वाचवले त्याबद्दल त्यांचा विशेष आदर मनामध्ये आहे असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीच्या वीज तोडणी केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. भाजपा सरकार असताना ५ वर्षात ना वीज तोडली न बिले शेतकर्यांना आली. माढा, दौंड, करमाळा, माळशिरस, बारामती या कोणत्याच तालुक्यात असा प्रकार केला जात नाही पण हा प्रकार इंदापूर तालुक्यातच का? याचाही शेतकऱ्यांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरू यासाठी मोठा लढा देऊ असे हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र ओबीसी अध्यक्ष माजी आमदार हडपसर योगेश आण्णा टिळेकर यांच्या शुभहस्ते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तसेच कोरोना च्या काळात ज्या दानशूर व्यक्तींनी कोरोना सेंटर चालण्यासाठी मदत केली अशाही व्यक्तींचा अष्टविनायक योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला .
निमगाव केतकी कोविड सेंटरला युवा नेते गजानन वाकसे, सुभाष जाधव, अभंग ताई, गणेश घाडगे ,राजकुमार जठार आप्पासाहेब तनपुरे ,अनिकेतजी वाघ, यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमास आपला जीव धोक्यात घालून अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स व मदतनीस यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात इयत्ता बारावी व दहावीत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे सत्कार करण्यात आले. सत्कारमूर्ती डॉ एम के इनामदार, डॉ मिलिंद खाडे ,डॉ अरविंद आरकिले, डॉ रघुनंदन पोमणे, अँड.सचिन राऊत,अंगणवाडी सेविका शुभांगी शिंदे, उर्मिला शेंडे , शेख, मनीषा भोंग एकूण बत्तीस महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी इंदापूर अर्बन चेअरमन देवराज भाऊ जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष शरद जामदार, महेंद्र रेडके, कृष्णाजी यादव, मारुती अण्णा वनवे, तानाजी बापू थोरात, गजानन वाकसे,माऊली चवरे, तेजस देवकाते ,राहुल जाधव ,पांडुरंग आण्णा शिंदे ,आकाश कांबळे, विलास बापू वाघमोडे ,मोहन दुधाळ ,गणपत भोंग, नंदकुमार चकोर, सुयोग सावंत, अमोलराजे इंगळे ,वैभव मोरे ,दिनेश घाडगे, उमेश राऊत, रमेश घाडगे, अर्जुन भोंग माणिक भोंग, तुषार खराडे ,प्रशांत बंडगर इंदापूर तालुका विस्तारक राजकुमार जठार उपस्थित होते. यावेळी निमगाव केतकी ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव,रिना भोंग,अर्चना भोंग,दादाराम शेंडे,हनुमंत राऊत हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार शहराध्यक्ष गणेश घाडगे यांनी मानले समस्त ग्रामस्थ निमगाव केतकी उपस्थित होते.

