प्रतिनिधी : संजय वायकर
अ .नगर : (दि .७) : नगर येथील सावेडी उपनगरातील प्रभाग क्र .२ तपोवन रोड येथे असणारी दुकाने शॉर्ट सर्किट झाल्याने आज रोजी दुपारी तीन वाजता आगीत भस्मसात झाली .
तपोवन रोड हा मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा रस्ता आहे . येथे विविध दुकाने आहेत . कोरोना नियमांच्या पार्श्वभूमीवर आज शनिवार असल्याने येथील सर्व दुकाने बंद होते . परंतु शॉर्ट सर्किट झाल्याने येथील एक कपड्याचे दुकानाने पेट घेतला .परिणामी शेजारी असणारे सराफाचे दुकान ,प्लंबिंगचे दुकान असे एकूण ३ते ४ दुकानांना आग लागली .
घटना स्थळी वेळीच पोलिसांनी धाव घेतली .अग्निशमन दलाच्या गाड्या लवकर पोहचल्याने आग अटोक्यात आणण्यात यश आले . परंतु येथील कपड्याचे दुकान मात्र संपूर्णपणे जळून अतोनात नुकसान झाले . येथे दुकाने बंद असल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही . परंतु ५ ते ६ दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
येथील स्थानिक प्रतिनिधी तसेच विविध पक्षाच्या राजकीय व्यक्तींनी घटना स्थळी भेट देऊन माहिती घेतली .

