शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
काव्यपुष्प साहित्य मंच समूह मुंबई
यांच्या विद्यमाने समूहाची रौप्यमहोत्सवी २५ वी कालचक्र या विषयावर राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा दि,२१ ते २५ सप्टेंबर या कालावधीमध्ये नुकतीच संपन्न झाली. नवोदित कवी/कवयित्री यांनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदवले. मराठी भाषेची प्रगल्भता वृद्धिंगत व्हावी ,मराठी मातीची सेवा व्हावी या साठी साहित्य क्षेत्रात राज्यभर समूह प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून समूह दर महिन्याला मासिक राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करत असते.
ही २५ वी रौप्यमहोत्सवी स्पर्धा असल्याने समूहाने साहित्यिकांना आवाहन केले होते. महाराष्ट्र राज्यासह गुजरात, हैदराबाद. कर्नाटक,गोवा या राज्यातून मराठी भाषा प्रेमी साहित्यिक मान्यवरांनी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. द्विशतका हुन अधिक रचना स्पर्धेसाठी साहित्यिकांनी पाठवल्या. या स्पर्धेला आलेल्या काव्य रचनांचे परीक्षण करण्यासाठी सांगली आटपाडी येथील जेष्ठ कवी/लेखक/ संगीतकार/पार्श्वगायक श्री चंद्रवर्धन लांडगे सर लाभले आहेत,दि.०८ ऑगस्ट रोजी स्पर्धेत सहभागी आणि विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती काव्यपुष्प साहित्य मचं समूहाचे कार्यवाहक कवी भगतसिंग दंडवते. पनवेल आणि समूह निरीक्षक जेष्ट कवी विलास वालावलकर, सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. समूहाच्या वतीने या पुढेही साहित्य सेवा करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला.


