shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यात आजपासून धागा हॅन्डलूम महोत्सव- अमृता फडणवीस यांनी केले उद्घाटन .

पुण्यात आजपासून धागा हॅन्डलूम महोत्सव
- अमृता फडणवीस यांनी केले उद्घाटन
 -अंकिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती



इंदापूर: प्रतिनिधी( दि.५ ऑगस्ट २०२१)
पुणे येथे आज गुरुवारी (दि.५) पासून धागा हॅन्डलूम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या महोत्सवाचे उदघाटन सौ.अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व नवीदिल्ली येथील इस्माच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांचेसह मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
       
पुण्यात एरंडवणा, कर्वे रोड येथे मनोहर मंगल कार्यालयात  दि. ५ व ६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या हॅन्डलूम महोत्सवामध्ये हातमागावरील अप्रतिम कलाकृतीचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. यावेळी अमृता फडणवीस यांनी प्रदर्शनाची पाहणी केली.



close