स्वर्गीय राजीवजी ...
राजबिंडे व्यक्तीमत्व
चांदी चमचा तोंडात
स्वप्न आगळे वेगळे
विहारावे आकाशात
आले राजकारणात
निराळे रे प्रांक्तनात
श्रमले रमले इथेही
ते रूजले मनामनात
कणखर झाले हात
सत्ता मिळता हातात
मशगुल झाले संपूर्ण
जन सेवेच्या व्रतात
धुरंधर नेतृत्व सगुण
आधीचं होते रक्तात
पेरली लाघवी रोपे
बदल घडवी तख्तात
जीवाची पर्वा कुठली
मिसळेसहज लोकात
माथेफिरू राक्षसवृत्ती
हा हंत जाहला घात
२)
अफगाण ..
बंदुकीच्या टोकावर
भयग्रस्त अफगाण
आपल्याचं माणसां
कसे करी शिरकाण
दबलेल्या भावनांची
तुंबलेली सारी घाण
वाफ येता बाहेर ती
उडे कशी दाणादाण
उन्मादा आला माज
चाले अति धूळधाण
मस्तवाली हिंसाचार
काळ्या रक्ता उधाण
सुटले आप्त घरदार
कंठा आले पंचप्राण
मारी असूर बेकसूर
माणूस विसरे जाण
जपलेली रोपे जाळी
बागा झाल्या वैराण
मातीची तुटता नाळ
पायातले जाते त्राण
३)बाल कामगार ..
बालकामगार प्रश्न
ते उभे आडवे धागे
सुटता सुटेना गुंता
बिघडून गेले तागे
मुलांना लावा वेठी
कसले विचीत्र वागे
प्रगती चालली पुढे
पळतो उलटे मागे
पडूनि भयाण स्वप्ने
का होत नाही जागे
चुका करतात मोठे
पिडलेजाई लहानगे
चटकफुका पैशांची
लहानपणीचं लागे
गरिबीच्या वणव्या
कोवळे शिक्षा भोगे
दोष एक दुस-याला
सावरा आवरा सोगे
खरे अपराधी कोण
कुणा सांगणे नलगे
सुधारणावादीआहो
बडवत राही ढोलगे
कोवळेआयु जळून
पौढ होतात मुलगे
४)स्वातंत्र्य दिन..
स्वातंत्र्य दिन येता
झेंडे बाजार फुले
झेंडे विकाया दिसे
जागोजागी रे मुले
विक्री होई जोरात
चेहरे कसले खुले
मिळे आज भाकर
वा झाले चांगभले
पाहून लहान मुले
आम्हीं केवढे भुले
घासा घीस जोरात
पाही आमचे भले
भावा पाडी खाली
फायदेपाहे आपले
पाहता पाहता अरे
झेंडे सगळे संपले
सटासटा भराभरा
झेंडे जाती विकले
घेणारे न् विकणारे
दोघां वाटे जिंकले
लहान छोटी फुले
बालकामगार झाले
प्रगती क अधोगती
प्रश्न मनाला सोले
-- हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.
www.kavyakusum.com

