shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर-सोलापूर रोडवरील साकत खुर्द येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा..!!

 नगर प्रतिनिधी- ( शिवा म्हस्के) नगर-सोलापूर रोडवरील साकत खुर्द शिवारातील केतन भारत पेट्रोलियम पंपावर शनिवारी (दि.३१जुलै) रात्री ३.वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकुन २ लाख ५५  हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला.या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती नुसार की नगर तालुक्यातील साकत खुर्द शिवारातील केतन भारत पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची घटना समजताच घटना स्थळी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, नगर तालुका पोलिस स्टेशन सा.पोलिस निरिक्षक राजेंद्र सानप, यांनी भेट दिली या वेळी या ठिकाणी श्वान पथकाला प्राचरण करण्यात आले होते. 






अज्ञात आरोपींनी पेट्रोल पंपाच्या कॅबिनमध्ये काऊंटर मधील तसेच  तेथील कर्मचारी अविनाश काळे व इतरांना  मारहाण करून त्यांच्या कडील मोबाईल तसेच पेट्रोलपंपावर आराम करण्यासाठी थांबलेल्या ट्रक चालकांना मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतले. 

पिस्टल धाक दाखवून धमकी दमदाटी ,मारहाण करून जबरी दरोडा टाकला या ठिकाणी ट्रक चालकांना व कामगारांना जबर मारहाण केली.या घटनेबाबतीत अक्षय कुंडलिक गोल्हारे (पेट्रोलपंप मालक) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर कलम १४३४/२०२१भादवि कलम ३९५,३९७,आर्म ॲक्ट ३/२५ प्रमाणे नगर तालुक्यात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास साह्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांचे पथक   करीत आहे

close