नगर प्रतिनिधी- (शिवा म्हस्के) नगर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती व गुंडेगाव गणाचे विद्यमान नगर पंचायत समिती सदस्य रविंद्र भापकर यांच्या शेष निधीतून अंबिलवाडी ता.नगर येथे विविध विकास कामांचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले,भैरवनाथ मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक,हायमॅक्स, सिमेंट बेंच बसविण्यात आले आहेत,गेल्या ५ वर्षाच्या काळात पंचायत समितीच्या माध्यमातून जनसुविधा निधी काय असतो आणि तो कसा मिळवावा लागतो हे युवा नेते रविंद्र भापकर यांनी दाखवून दिले आहे,
गुंडेगाव पंचायत समितीच्या १४ गावात त्यांनी विविध विकास कामांना निधी मिळवून दिला आहे,गावोगावी हायमॅक्स,सिमेंट बेंच बसवले आहेत,सामान्य माणसांना व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना त्यांनी मिळवुन दिल्या आहेत,कोरोनाच्या काळात स्व:त उपस्थित राहून जनतेच्या समस्या सोडविण्याचे महत्वपूर्ण सहकार्य केले आहे,सामान्य माणसांच्या अडचणी पदाच्या माध्यमातून सोडवत असताना कधीही कोणत्याही प्रकारचा दुजाभाव केला जात नाही असे ग्रामस्थ आपल्या चर्चेत करत असतात.,रुईछत्तीशी,अंबिलवाडी,वाटेफळ,साकत,दहिगाव,पारगाव,राळेगण,गुणवडी,हातवळण,मठपिंप्री,गुंडेगाव,वडगाव,तांदळी,शिराढोन या सर्वच गावात त्यांनी जनसंपर्क ठेवला आहे,उपसभापती असताना तालुक्यातील सर्वच गावातील लोकांच्या समस्या पंचायत समितीच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा अतोनात प्रयत्न केला आहे,आज आंबिलवाडी ता.नगर येथे विविध विकास कामांचे लोकार्पण करत असताना जनतेला आपल्या अडचणी प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी तत्पर प्रयत्नशील असेल असे आश्वासन भापकर यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ,ग्रामविकास अधिकारी अशोक जगदाळे,सरपंच केशवराव वाबळे,उपसरपंच नाथाभाऊ शेटे,ग,मारूती खताळ,मारुती वाबळे,,दिलीप वाघ,व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



