shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुळवे कुटूंबियांनी एकीचे बळ शेतीत वापरून साधले यशाचे शिखर.. दीक्षा बेलपत्रे.

गुळवे कुटूंबियांनी एकीचे बळ शेतीत वापरून साधले यशाचे शिखर.. दीक्षा बेलपत्रे.


महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने इंदापूर तालुक्यातील काटी येथे असामान्य शेतकरी कुटुंबाची यशोगाथा .

इंदापूर प्रतिनिधी: (२ ऑगस्ट २०२१)लाटेला घाबरू नका पार होत नाही प्रयत्न करणाऱ्यांची कधी हार होत नाही.याचे उत्तम उदाहरण म्हणजे काटी गावचे  मोहन दगडू गुळवे व त्यांचे कुटुंबीय आहेत.  मोहन दगडू गुळवे हे शेती क्षेत्रात खूप गाजलेले नाव आहे.   मोहन गुळवे गेली चाळीस वर्ष कृषी क्षेत्रात आहेत.  गुळवे  यांचे सध्या खूप मोठे शेतीक्षेत्र आहे या यशाची सुरुवात अत्यंत खडतर प्रवासाने झाली आहे. 

गुळवे कुटुंब हे साधारण तीस सदस्यांचे आहे. त्यांना त्यांच्या आठ भावंडांची खूप साथ लाभली आहे त्यांनी आयुष्यात हार मानणे कधीच जमले नाही. त्यांनी सर्वप्रथम शेतीत द्राक्षे हे पीक घेतले त्यात त्यांनी पहिले फिक्स खूप उत्तम रित्या पिक काढले. पण नंतर अत्यंत जोराच्या वारा पावसाने भाग पूर्ण जमीनदोस्त झाली. गुळवे यांनी यावेळी खूप तोटा सहन केला .
 पण परिस्थितीपुढे झुकतील ते गुळवे कसले. गुळवे यांनी पुन्हा शून्यातून निर्मिती करण्यासाठी प्रयत्न चालू केले. वेळप्रसंगी शेतीतून एकत्र कुटुंब चालवता येत नव्हते, भावंडांचे शिक्षण पूर्ण करता येत नव्हती म्हणून स्वतःच्या शिक्षण थांबून मिळेल ती कामे करून त्यांनी घर चालवले आहे, लघु व्यवसाय सुद्धा चालू केला.
या पैशातून त्यांनी शेतीमध्ये कोश व्यवसाय चालू केला.या  व्यवसायात त्यांनी घवघवीत यश संपादन केले. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले . अनेक वर्षे त्यांनी यातून खूप उत्पादन मिळवले पण नंतर मलबेरी शेतावर महाभयंकर रोग आला आणि पूर्ण भाग जळून गेला .त्यावेळी या कुटुंबाने खूप नुकसान पाहिले.
 पण यावेळी मागील अनुभवातून  त्यांनी  शेती निगडीत व्यव्साय सुरु केले. म्हणून त्यांना यावेळी नुकसानभरपाई चा जास्त त्रास झाला नाही. गुळवे बंधुतिल एका भावाने ( कै. औदुंबर गुळवे) यांनी तरकारी चा व्यवसाय स्वीकारला होता. तसेच एका भावाने विजय गुळवे ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात यश मिळवले . एवढ्यावरच न थांबता एका कुटुंबीयांनी  सचिन गुळवे कृषी सेवा केंद्र सुरू केले. तसेच  संजय व संदिप गुळवे मका प्रक्रिया करून कोर्न फ्लेक्स तयार केले. आता हा उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहे. तसेच गुळवे बंधूंचे किराणा दुकानाच्या तीन शाखा आहेत. तोपर्यंत नजीकच्या गावात कै. श्री सूर्यकांत गुळवे यांनीही अत्यंत आधुनिक रित्या शेती करुन पंचक्रोशित नाव केले होते. डॉ. अरुण गुळवे यांनी गावातच आपला दवाखाना चालू करून ग्रामस्थांची सेवा केली आहे, व  सुधीर गुळवे यांनी किराणा दुकान वर आपले लक्ष केंद्रित करुन शेति संभाळली आहे. एवढ्यावरच न थांबता कुटुंबीयांनी उसाचा हार्वेस्टर तसेच मशीन अशा अनेक मशिनरी स्व कष्टावर घेतल्या आहेत.
    फक्त पुरुषच नव्हे तर कुटुंबातील महिला देखील या कार्यात चांगलेच हातभार लावतात वेळप्रसंगी स्वतः प्रत्यक्ष मदत करून भार हलका करतात. या सर्वांच्या सहकार्यामुळे.   मोहन दगडू गुळवे यांनी पुन्हा जोमाने काम चालू केले सध्या  मोहन गुळवे यांच्याकडे  शेततळ्यात मत्स्य पालनही मोठ्या प्रमाणात केले जाते. तसेच शेतात पिंक तैवान पेरू, डाळिंब, सोयाबीन, भुईमूग,  मुळा, कांदा, भाजेपाला व ऊस आहे. त्याचबरोबर मका देखील खूप मोठ्या प्रमाणात लावली जाते.
 मध्यंतरी त्यांनी अनोखा विक्रम केला, त्यामुळे ते खूप प्रचितीस आले एक मुळा तब्बल नऊ ते दहा किलो भरला व आता एकरी १०० टन ऊस उत्पादन करण्याचा अनोखा ध्यास त्यांनी घेतला आहे 
 गुळवे कुटुंबीय अत्यंत बेताच्या परिस्थितीतून वर आले आहेत व त्यांच्या यशाचा प्रवास समस्त काटी ग्रामस्थांनीही पाहिला आहे. एकमेकांच्या हातात हात देऊन पुढे चालत आले आहेत एक पडला तर बाकीच्यांनी संभाळून घेतले आहे. त्यांनी फक्त शेतीच नव्हे तर गावच्या विकासाला हातभार लावला आहे.   मोहन दगडू गुळवे स्वतः काटी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. त्यांना कुटुंबीयांसोबत गावाचाही तितकाच विकास केला आहे. त्यांच्याशी संवाद साधताना असे निष्पन्न झाले की  त्यांनी कधीच परिस्थितीसमोर हार मानली नाही व हिच शिकवण त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना व त्यांच्या मुलांना दिली आहे आज गुळवे कुटुंबीय यशाच्या शिखरावर या कानमंत्रातुन पोहोचले आहेत.  
कितीही संकटे आली तरी खचून न जाता जिद्दीने व चिकाटीने पुढे चालत राहा यश तुमच्या पायाशी नक्कीच येईल असे कुटुंबीयांनी ग्रामस्थांना व इतर शेतकऱ्यांना संदेश दिला आहे ही माहिती कृषी महाविद्यालय बारामती  चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषिकन्या दिक्षा अर्जुन बेलपत्रे यांनी दिली.
close